
News : 18 वर्षांच्या दुष्काळानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने अखेर पंजाब किंग्सचा पराभव करत आयपीएल विजेतेपदाची ट्रॉफी उंचावली. अखेरपर्यंत उत्सुकता टिकवून ठरणाऱ्या या मॅचने दोन्ही टीमच्या चाहत्यांच्या संयमाचा अंत पाहिला. अखेरपर्यंत कोणती टीम जिंकणार हे कुणालाच ठरवता येत नव्हतं. टीमचा विजय जवळ आलाय हे निश्चित होताच भर मैदानात विराटला कोसळेल रडू असो किंवा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू टीमने केलेलं सेलिब्रेशन असो या मॅचमधील प्रत्येक क्षण चर्चेत राहिला.