T20 Blast VIDEO : RCB च्या 'सिक्सर किंग'चा पिक्चर पडला! मिडलसेक्सने टी 20 मधील सर्वात मोठं टार्गेट केलं चेस

Will Jacks Sixes VIDEO
Will Jacks Sixes VIDEOesakal
Updated on

Will Jacks Sixes VIDEO : इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू विल जॅक्स हा आयपीएलमध्ये आरसीबीकडून खेळतो. या विल जॅक्सने टी 20 ब्लास्टमध्ये मिडलसेक्सविरूद्ध मोठा धमका केला. सरेकडून खेळणाऱ्या जॅक्सने ल्युक होलोमन टाकत असलेल्या 11 व्या षटकात सलग 5 षटकार ठोकले.

जॅक्सला युवराज सिंगच्या सहा चेंडूत सहा षटकार ठोकण्याच्या विक्रमाशी बरोबरी करण्याची संधी होती. मात्र ही संधी जॅक्सला साधता आली नाही. विशेष म्हणजे जॅक्सच्या 96 धावांच्या खेळीच्या जोरावर सरेने मिडलसेक्सविरूद्ध 253 धावांचे आव्हान ठेवले. मात्र हे आव्हान मिडलसेक्सने 4 चेंडू शिल्लक ठेवून पार केले.

Will Jacks Sixes VIDEO
Ricky Ponting : ..तर मॅक्युलम नाही पाँटिंग असता इंग्लंडचा प्रशिक्षक, रिकीने का नाकारली ऑफर?

रॉयल चॅलेंजर बेंगलोरने इंग्लंडच्या विल जॅक्सला 3.2 कोटी रूपयाची बोली लावून आपल्या गोटात खेचले होते. मात्र इंग्लंड बांगलादेश वनडे सामन्यात त्याचा स्नायू दुखावला त्यामुळे तो यंदाच्या आयपीएल हंगामाला मुकाला होता.

सामन्याबद्दल बोलायचं झालं तर जॅक्सने ल्युक होलोमन टाकत असलेल्या 11 व्या षटकात पहिल्या पाच चेंडूवर पाच षटकार मारले. ल्युकने हरप्रकारे गोलंदाजी करत जॅक्सला हाणामारी करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र चांगल्याच फॉर्ममध्ये असलेल्या जॅक्सने प्रत्येक चेंडू मैदानाबाहेर टोलवला.

षटकातील सहावा चेंडू देखील जॅक्स षटकार मारणार अन् युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी करणार असे वाटत होते. पाच चेंडूत पाच षटकार खाणारा होलोमन देखील हतबल झाला होता. त्याने सहावा चेंडू फूलटॉस टाकला. जॅक्स या चेंडूवर षटकार मारत विक्रमाशी बरोबरी करणार असे वाटत होते. मात्र विल जॅक्सला या चेंडूवर षटकार मारण्यात अपयश आले.

Will Jacks Sixes VIDEO
Sanjay Dutt purchased Cricket Team : शाहरूख, प्रितीनंतर संजूबाबाने देखील विकत घेतली टीम, केले करोडो रूपये खर्च

सामन्याबद्दल बोलायचं झालं तर जॅक्सने 45 चेंडूत 96 धावा ठोकल्या. तर लॉरी एव्हान्सने 37 चेंडूत 85 धावा ठोकल्या. सरेने मिडलसेक्सविरूद्ध 7 बाद 252 धावांचे आव्हान ठेवले. मात्र हे आव्हान मिडलसेक्सने 4 चेंडू शिल्लक ठेवून पार केले.

मिडसेक्सने इंग्लंडमध्ये टी 20 क्रिकेट इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या चेस करत इतिहास रचला. मिडलसेक्सकडून कर्णधार स्टिफन एस्किनाझीने 39 चेंडूत 73 तर मॅक्स होल्डेनने 38 चेंडूत 65 धावांची खेळी केली.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com