Sanjay Dutt purchased Cricket Team : शाहरूख, प्रितीनंतर संजूबाबाने देखील विकत घेतली टीम, केले करोडो रूपये खर्च

Sanjay Dutt purchased Cricket Team
Sanjay Dutt purchased Cricket Teamesakal
Updated on

Sanjay Dutt purchased Cricket Team : बॉलिवूड अभिनेता संजय दत्त आता लीग क्रिकेटच्या दुनियेत देखील उतरला आहे. त्याने नुकतेच टी 10 क्रिकेट लीगमधील संघ खरेदी केला होता. आता तो दुसऱ्या क्रिकेट लीग संघाचा मालक झाला आहे. बॉलिवूड स्टार शाहरूख खान, प्रिती झिंटा यांच्यानंतर आता संजय दत्त देखील संघ मालक म्हणून लीग क्रिकेटच्या व्यवसायात उतरला आहे.

Sanjay Dutt purchased Cricket Team
WI vs IND India squad : निवडसमितीची महत्वपूर्ण बैठक... रोहितबाबत होणार आजच निर्णय?

संजय दत्तने नुकतेच हरारे हरिकेन्स संघ विकत घेतला आहे. जागतिक क्रिकेट वर्तुळात आयपीएलने आपला दबदबा निर्माण केला आहे. यामुळे आता सर्वच देशात लीग क्रिकेट वाढू लागले आहे. झिम्बाब्वेने देखील झिम अफ्रो टी 10 क्रिकेट लीग नावाने एक लीग सुरू केली असून या लीगमध्ये संजय दत्तने रस दाखवला आहे.

संजय दत्तने झिम अफ्रो टी 10 क्रिकेट लीगमध्ये हरारे हरिकेन्स संघ खरेदी केला आहे. झिम टी 10 हा वेगवान क्रिकेट फॉरमॅट आहे. संजय दत्तने हा संघ सोहान रॉयच्या साथीने खरेदी केले आहे. सोहान रॉय हा एरिस ग्रुप ऑफ कंपनीचे संस्थापक आहेत. संजय दत्तचा हा दुसरा क्रिकेट संघ आहे.

Sanjay Dutt purchased Cricket Team
Virender Sehwag : निवडसमिती अध्यक्षपदाची ऑफर... काय म्हणाला विरेंद्र सेहवाग?

झिम अफ्रो टी 10 मधील संघ खरेदी केल्यानंतर संजय दत्त माध्यमांशी बोलताना म्हणाला की, 'क्रिकेट हा भारतात एका धर्मासारखा आहे. तो देशातील एक सर्वात मोठा खेळ आहे. मला असे वाटते की हा खेळ जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचवला पाहिजे. झिम्बाब्वेचा खेळाचा इतिहास समृद्ध आहे. '

त्यांच्याशी जोडलं जाणं माझ्यासाठी खूप आनंददायी आहे. मला आशा आहे की झिम अफ्रो टी 10 मध्ये हरारे हरिकेन्स चांगली कामगिरी करेल.' संजय दत्तने हरारे हरिकेन्स खरेदी करण्यासाठी कोट्यावधी रूपये खर्च केल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com