मॅरेथॉनसाठी मुंबई सज्ज

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 जानेवारी 2017

मुंबई - बघता बघता चौदावे वर्ष साजरे करत असलेल्या मुंबई मॅरेथॉनसाठी मुंबापुरी सज्ज झाली आहे. सुरक्षा यंत्रणेबरोबर स्पर्धकांचीही लगबग सुरू झाली आहे. रविवारी (ता. १५) भल्या पहाटे ५ वाजून ४० मिनिटांनी अर्धमॅरेथॉन सुरू होणार असल्यामुळे उद्या (ता. १४) सर्व तयारी पूर्ण केली जाईल.

एलिट धावपटूंसाठी पूर्ण मॅरेथॉन, भारतीय धावपटूंसाठी अर्ध मॅरेथॉन आणि हवशे गवशांसाठी ड्रिम रन, मुंबई मॅरेथॉनचे आकर्षण असते. दुपारी १२ पर्यंत सर्व शर्यती पूर्ण करण्याच्या हेतूने प्रत्येक शर्यतीचे वेळापत्रक आखले जाते. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे स्पर्धेची सुरवात आणि सांगता होत असली तरी वरळी डेअर येथील परिसरही तेवढाच महत्त्वाचा आहे. कारण येथून सकाळी ५ वाजून ४० मिनिटांनी अर्ध मॅरेथॉन सुरू होईल, तेव्हा सूर्योदयही झालेला नसेल. या शर्यतीची सांगता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे होणार आहे.

Web Title: Ready for Mumbai Marathon