रेयाल माद्रिद विश्‍वविजेते

पीटीआय
सोमवार, 19 डिसेंबर 2016

योकोहामा - स्टार स्ट्रायकर ख्रिस्तिआनो रोनाल्डो याने नोंदविलेल्या हॅटट्रिकच्या जोरावर रविवारी रेयाल माद्रिदने कशिमा अँटलर्सचा 4-2 असा पराभव करून क्‍लब विश्‍वकरंडक स्पर्धेत विजेतेपद मिळविले.

रोनाल्डोसाठी हे विजेतेपद खास ठरले. या वर्षी त्याने चॅंपियन्स लीग, युरोपियन चॅंपियन्स लीग अशा दोन विजेतेपदाबरोबरच वर्षातील सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटूचा किताबही मिळविला.

क्‍लब विश्‍वकरंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात रेयालसाठी रोनाल्डोने तीन, तर करीम बेन्झेंमाने एक गोल केला. कशिमासाठी दोन्ही गाकू शिबासाकी याने केले. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूसाठी रोनाल्डोच "गोल्डन बॉल'चा मानकरी ठरला.

Web Title: Real Madrid Champion