रेयाल-ॲटलेटिको उपांत्य फेरीत पुन्हा आमने सामने

पीटीआय
शनिवार, 22 एप्रिल 2017

न्यूयॉन - युरोपियन फुटबॉलमधील पारंपरिक प्रतिस्पर्धी रेयाल आणि ॲटलेटिको माद्रिद या वेळी चॅंपियन्स लीगच्या उपांत्य फेरीतच आमने सामने येणार आहेत. त्याच वेळी दुसरी उपांत्य लढत फ्रान्सच्या मोनॅको आणि इटलीच्या युव्हेंट्‌स यांच्यात होईल. स्पर्धेची अंतिम लढत ३ जून रोजी कार्डिफ येथे होणार आहे. 

चॅंपियन्स लीगचा ‘ड्र’ शुक्रवारी ‘युईएफए’च्या मुख्यालयात काढण्यात आला. त्यानुसार चॅंपियन्स लीगमध्ये २०१४ आणि १६ नंतर पुन्हा एकदा ‘ऑल माद्रिद’ लढत उपांत्य फेरीतच होणार आहे. यापूर्वीच्या दोन्ही लढतींत रेयालने ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या खेळाने बाजी मारली होती. 

रेयाल माद्रिदला सर्वाधिक पसंती मिळत आहे. रोनाल्डोच्या हॅटट्रिकमुळे त्यांनी बायर्न म्युनिकचे आव्हान ३-० असे मोडून काढले. मात्र, दुसरीकडे योगायोगाच्या समीकरणानुसार युव्हेंट्‌सलादेखील पसंती वाढत आहे. चॅंपियन्स लीगमध्ये बार्सिलोनाला गोल करू न देणारा संघ चॅंपियन्सचा विजेता ठरला आहे. या वेळी उपांत्यपूर्व फेरीत युव्हेंट्‌सने ही कामगिरी केली आहे. बार्सिलोनाचा बचावपटू गेरार्ड पिके यानेदेखील युव्हेंट्‌सला विजेतेपदाची संधी दिली आहे. युव्हेंट्‌सने १९९६ मध्ये या स्पर्धेचे विजेतेपद मिळविले होते. यंदाच्या मोसमातील त्यांची कामगिरी लक्षात घेता मोनॅकोविरुद्ध त्यांचेच पारडे जड असल्याचे पिके याचे म्हणणे आहे. पिके म्हणाला, ‘‘उपांत्यपूर्व फेरीत १८० मिनिटे बार्सिलोनाला गोल करण्यापासून रोखणे सोपे काम नाही. युव्हेंट्‌सचा गोलरक्षक बफॉन याने ती कामगिरी करून दाखवली आहे. त्याच्या भक्कम गोलरक्षणामुळे त्यांचे पारडे नक्कीच जड असेल.’’

Web Title: Real vs Atletico Madrid