'या' कारणामुळे शास्त्री ठरले सर्वांपेक्षा सरस

the reason why ravi shastri was picked up as a coach of team India
the reason why ravi shastri was picked up as a coach of team India

मुंबई : भारताच्या प्रशिक्षकपदी रवी शास्त्रींचीच पुन्हा निवड करण्यात आली आहे. शास्त्रींच्या अगोदरच्या कामगिरीच्या जोरावरच ते सर्वांपेक्षा सरस ठरले आणि म्हणूनच त्यांची निवड करण्यात आली असे सल्लागार समितीच्या सदस्या शांता रंगस्वामी यांनी सांगितले. 

कपिल देव, अंशुमन गायकवाड व शांता रंगास्वामी यांची क्रिकेट सल्लागार समिती मुंबईतील बीसीसीआय मुख्यालयात आज प्रशिक्षकपदाच्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. त्यानंतर हा निर्णय देण्यात आला.

''आम्ही तिघांनी प्रत्येकाला गुण दिले, त्या गुणांची बेरीज केल्यानंतर शास्त्रीचे एक पाऊल पुढे ठरले. कोणी किती गुण दिले हे आम्ही पाहिले नाही. तिघांची एकत्रित बेरीज केली,'' असे मत कपिलदेव यांनी व्यक्त केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com