Paris Olympic Qualifying Trials : नेमबाजी पात्रता स्पर्धेतील नियम शिथिल करा

पॅरिस ऑलिंपिक पात्रता चाचणी स्पर्धांमधील अटी शिथिल करा, अशी मागणी देशातील काही अव्वल नेमबाजांनी केली.
Paris Olympic Qualifying Trials
Paris Olympic Qualifying Trialssakal

नवी दिल्ली : पॅरिस ऑलिंपिक पात्रता चाचणी स्पर्धांमधील अटी शिथिल करा, अशी मागणी देशातील काही अव्वल नेमबाजांनी केली. त्याद्वारे त्यांना या पात्रता स्पर्धांत सहभागी होता येईल; परंतु राष्ट्रीय रायफल संघटनेने स्पष्ट नकार दिला आहे.

प्रत्येक गटात राष्ट्रीय रँकिंगनुसार केवळ पाचच नेमबाज ऑलिंपिक पात्रता स्पर्धांत सहभागी होऊ शकतात, असा राष्ट्रीय नेमबाजी संघटनेचा नियम आहे. पॅरिसमध्ये होणाऱ्या ऑलिंपिकसाठी आता दिल्ली आणि भोपाळमध्ये मिळून चार चाचणी स्पर्धा नियोजित आहेत. यातील पहिल्या दोन स्पर्धा दिल्लीतील कर्निसिंग रेंजवर १८ ते २७ एप्रिल, तर दुसरी स्पर्धा भोपाळमध्ये १० ते १९ मे दरम्यान होणार आहे.

Paris Olympic Qualifying Trials
IPL 2024 Suryakumar Yadav : सूर्यकुमार आला रे... पराभवाच्या खाईत हेलखावे खात असलेल्या मुंबई इंडियन्सला सर्वात मोठा दिलासा!

भारताकडून आतापर्यंत १९ नेमबाजांनी ऑलिंपिक कोटा मिळवलेला आहे; परंतु सध्या त्यांचा फॉर्म हरपलेला आहे, तर राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्पर्धांत त्यांच्यापेक्षा अधिक चांगली कामगिरी केलेले नेमबाज ऑलिंपिकमध्ये स्थान मिळवण्यास प्रयत्नशील आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com