Ricky Ponting Health : पॉटिंग रूग्णालयातून कॉमेंटरी बॉक्समध्ये परतला; सांगितलं नेमकं लंचपूर्वी काय झालं?

Ricky Ponting Health Update
Ricky Ponting Health Updateesakal
Updated on

Ricky Ponting Health Update : ऑस्ट्रेलिया - वेस्ट इंडीज यांच्यातील पहिल्या पर्थ कसोटीत शुक्रवारी ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉटिंगच्या छातीत दुखू लागल्याने त्याला त्वरित रूग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, त्याच्यावर अनेक चाचण्यात करण्यात आल्या. त्याला चाचण्यांनंतर रूग्णालयातून डिस्चार्च मिळाला. पॉटिंग डिस्चार्च मिळाल्यानंतर कॉमेंटरी बॉक्समध्ये परतला.

Ricky Ponting Health Update
Rohit Sharma : सडेतोड कर्णधार! कोणाला घ्यायचं कोणाला नाही हे मला अन् प्रशिक्षकाला चांगल कळतं

रिकी पॉटिंगने यावेळी शुक्रवारी काय घडले याबाबत माहिती दिली. पॉटिंग सामना सुरू होण्यापूर्वीच्या कार्यक्रमात म्हणाला की, 'मी काल बऱ्याच लोकांना घाबरून टाकले होते. माझ्यासाठी देखील तो घाबरवणारा क्षण होता. मी कॉमेंटरी बॉक्समध्ये बसलो होतो. दरम्यान, माझ्या छातीत काही काळासाठी खूप तीव्रतेने वेदना होऊ लागल्या. मी स्ट्रेचिंग करून वेदना कमी करण्याचा प्रयत्न केला. मी ऑन एअर असल्याने कोठेही जाण्याचे टाळत होते.'

Ricky Ponting Health Update
Rawalpindi Pitch : रावळपिंडीत 3 दिवसात 7 शतके; जो रूटचा जुगाड देखील नाही आला कामी

पॉटिंग पुढे म्हणाला की, 'मी उठून काही काळ चाललो मात्र मला चक्कर येऊ लागली. त्यामुळे मी पुन्हा बेंचवर बसलो. मी जस्टीन लँगरला मी अस्वस्थ असल्याचे सांगितले. तो माझ्या सोबत कॉमेंटरी करत होता. माझे बोलने क्रिस जोन्सने ऐकले आणि त्याने मला तेथून नेले. 10 ते 15 मिनिटातच आम्ही रूग्णालयात पोहचलो. तेथे डॉक्टरांनी माझ्यावर उपचार केला. लँगरने मला खाली जाण्यास मदत केली.

पॉटिंगने रूग्णालयात काही काळ घालवला. चांगली झोप देखील घेतली. पॉटिंग म्हणाला की आज सकाळी मला चांगले वाटू लागले. आज मला उत्साही वाटत आहे. मी माझ्याबाबतीत काय झाले हे सांगतोय कराण मी पाहिलं आहे की माझी तब्येत बिघडल्यानंतर लँगर आणि जोन्सने कशा प्रकारे माझी मदत केली.

हेही वाचा : दिव्यांग खेळाडूंची खडतर 'पाठशाळा'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com