सडेतोड कर्णधार! कोणाला घ्यायचं कोणाला नाही हे मला अन् प्रशिक्षकाला चांगल कळतं | Rohit Sharma Rahul Dravid Bangladesh Vs India | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rohit Sharma Bangladesh Vs India 1st ODI

Rohit Sharma : सडेतोड कर्णधार! कोणाला घ्यायचं कोणाला नाही हे मला अन् प्रशिक्षकाला चांगल कळतं

Rohit Sharma Bangladesh Vs India 1st ODI : भारत आणि बांगलादेश यांच्याविरूद्धची तीन वनडे सामन्यांची मालिका उद्यापासून (दि. 4) सुरू होत आहे. या मालिकेपूर्वी भारताचा पूर्णवेळ कर्णधार रोहित शर्मा पत्रकार परिषदेला सामोरा गेला. भारतीय क्रिकेट वर्तुळात वनडे वर्ल्डकपसाठी भारतीय संघ कसा असेल याबाबच चर्चा आतापासूनच सुरू झाली आहे. याबाबत रोहित शर्माला देखील प्रश्न विचाण्यात आला.

वर्ल्डकप तयारीबाबत प्रश्न विचारल्यावर रोहित शर्माने पत्रकार परिषदेत स्पष्ट केले की, 'ज्यावेळी तुम्ही सामना खेळता त्यावेळी तुम्ही कशाची ना कशाची तरी तयारी करत असताच. वर्ल्डकप अजून 8 - 9 महिने पुढे आहे. आम्ही इतका पुढचा विचार करत नाहीये. संघ म्हणून आम्हाला काय करायचं आहे यावर आमचं लक्ष आहे.'

रोहित शर्मा पुढे म्हणाला की, 'खूप गोष्टींचा विचार न करणे हे आमच्यासाठी खूप गरजेचे आहे. या खेळाडूला खेळवायचं की त्या खेळाडूला खेळावायचं असले विचार करण्यात अर्थ नाही. काय करायंचच ते मला आणि माझ्या प्रशिक्षकाला कळतं. ज्यावेळी आम्ही वर्ल्डकप स्पर्धेच्या जवळ पोहचवू त्यावेळी आम्ही ठरवू.'

रोहित शर्मा अती क्रिकेटबद्दल बोलताना म्हणाला, 'एक व्यावसायिक क्रिकेटपटू म्हणून आम्हाला आमची उर्जा कायम राखावी लागते. खूप क्रिकेट खेळलं जात आहे हे मान्य आहे. त्यामुळेच आम्ही अनेकांना ब्रेक देत आहोत. लोकांनीही समजून घेतलं पाहिजे की ज्यावेळी आम्ही खेळाडूंना ब्रेक देतो त्यावेळी आम्ही फक्त वर्कलोड व्यवस्थानपाचा विचार करत असतो. आम्ही ही दूरदृष्टी ठेवून हे करत आहोत.'

तो पुढे म्हणाला की, 'क्रिकेट आता थांबणार नाही. आता अवती भवती खूप क्रिकेट असणार आहे. त्यामुळे आता आपण आपल्या खेळाडूंचे उत्तम प्रकारे व्यवस्थापन करावे लागले. तुम्ही तुमचे चांगले खेळाडू कायम उत्तम उर्जेने खेळावेत असे तुम्हाला वाटते तर त्यांना ब्रेक देणे गरजेचे आहे. त्यांना ताजे तवाने ठेवणे महत्वाचे आहे.'

हेही वाचा : दिव्यांग खेळाडूंची खडतर 'पाठशाळा'