IPL 2023 मध्ये दिसणार ऋषभ पंत? हंगाम सुरू होण्याआधीच कोच पाँटिंगचा खुलासा... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Rishabh Pant

IPL 2023 मध्ये दिसणार ऋषभ पंत? हंगाम सुरू होण्याआधीच कोच पाँटिंगचा खुलासा...

IPL 2023 Rishabh Pant : दुखापतीमुळे भारतीय क्रिकेट संघातून बाहेर असलेला स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतला आयपीएलच्या संपूर्ण हंगामात खेळणार नाही. तो 16 व्या हंगामातूनही बाहेर गेला आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरकडे दिल्ली कॅपिटल्स संघाची कमान सोपवण्यात आली आहे. वॉर्नरने यापूर्वी सनरायझर्स हैदराबादला त्याच्या नेतृत्वाखाली चॅम्पियन बनवले आहे. दरम्यान दिल्ली कॅपिटल्सचे मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांनी पंतबाबत मोठे वक्तव्य केले आहे.

गेल्या वर्षी 30 डिसेंबरला ऋषभ पंत कार अपघातात गंभीर जखमी झाला होता. या दुखापतीमुळे तो आयपीएलच्या 16व्या मोसमात सहभागी होऊ शकणार नाही. त्याच्या जागी ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरकडे दिल्ली कॅपिटल्स संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. अलीकडेच पंतने काही व्हिडिओ देखील शेअर केले होते ज्यात तो बरा होताना दिसत आहे.

दिल्ली कॅपिटल्सचे मुख्य प्रशिक्षक रिकी पॉन्टिंगने शुक्रवारी दिल्ली कॅपिटल्सची नवीन जर्सी लाँच केली. या आयोजित कार्यक्रमात पॉन्टिंगला विचारण्यात आले की पंतला आयपीएल-2023 दरम्यान डगआऊटमध्ये खेळाडूंना चीअर करताना पाहता येईल का, यावर पाँटिंग म्हणाला, 'याबाबत आत्ताच काही सांगता येणार नाही. तो बरा होत आहे. त्याच्याबद्दल सतत अपडेट्स देखील घेतले जात आहेत, परंतु सध्या डगआउटमध्ये त्याच्या उपस्थितीबद्दल काहीही सांगणे कठीण आहे.

आयपीएल 2023 साठी दिल्ली कॅपिटल्स संघ : डेव्हिड वॉर्नर, मनीष पांडे, पृथ्वी शॉ, रिले रोसो, रिपल पटेल, रोवमन पॉवेल, सरफराज खान, यश धुल, अमन हकीम खान, अक्षर पटेल, ललित यादव, मिचेल मार्श, फिल सॉल्ट, एनरिक नोरखिया, चेतन साकारिया, इशांत शर्मा, कमलेश नागरकोटी, खलील अहमद, कुलदीप यादव, लुंगी नगिडी, मुकेश कुमार, मुस्तफिजुर रहमान, प्रवीण दुबे, विकी ओस्तवाल.