Rinku Singh lucky charm
esakal
Rinku Singh’s return to Team India sparks hopes of T20 World Cup : आगामी टी-२० विश्वकप स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली असून या स्पर्धेसाठी १५ जणांची निवड करण्यात आली आहे. यातील काही नावं अनेकांना आर्श्चयचकीत करणारी आहे. यापैकीच एक नाव म्हणजे रिंकू सिंग. महत्त्वाचे म्हणजे रिंकू सिंगचा (Rinku Singh) संघात समावेश करण्यात आल्याने अनेकांनी आनंददेखील व्यक्त केला आहे. कारण तो संघात असणं भारतासाठी लकी असल्याचं बोललं जातं आहे. यासाठी मागच्या काही स्पर्धांचा दाखला दिला जातो आहे.