रिओमध्ये लिएंडर पेसला राहण्याची खोली नाही

रॉयटर्स
शुक्रवार, 5 ऑगस्ट 2016

रिओ दि जेनोरियो - ब्राझील येथे "रिओ ऑलिम्पिक‘साठी पोचलेल्या भारतीय टेनिसपटू लिएंडर पेसला निवासासाठी खोली मिळाली नसल्याची माहिती समोर आली आहे.

याबाबत बोलताना लिएंडर पेस म्हणाला, "मी भारताच्या वतीने सहा ऑलिंपिक स्पर्धा खेळल्या आहेत. मात्र मला राहण्यासाठी खोली मिळाली नसल्याने मी थोडासा नाराज झालो आहे. मी न्युयॉर्कमध्ये एका स्पर्धेत सहभागी झालो होतो. ती संपल्यानंतर मी थेट इथे पोचलो.‘ मात्र रिओमध्ये पोचल्यानंतर त्याच्यासाठी खोली राखीव ठेवली नसल्याची माहिती त्याला मिळाली. दरम्यान त्याची भारतीय ऑलिंपिक दल प्रमुखांच्या खोलीत व्यवस्था करण्यात आली आहे.

रिओ क्रीडानगरीत भारतीय संघाला जी खोली देण्यात आली आहे, त्यात तीन बेडरुम आहेत. एक रोहन बोपन्नाला, दुसरी फिजियोला, तर तिसरी कर्णधार जीशान अलीला देण्यात आली आहे, अशी माहितीही पेसने यावेळी दिली.

Web Title: Rio Leander