रिषभ पंतने मोडला धोनीचा विक्रम

Rishabh Pant breaks MSDhoni  record
Rishabh Pant breaks MSDhoni record

जॉर्जटाऊन (गयाना) -  रिषभ पंतने वेस्ट इंडीजविरुद्ध तिसऱ्या टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात ६५ धावांची नाबाद खेळी केली. याबरोबरच त्याने मातब्बर वरिष्ठ सहकारी महेंद्रसिंह धोनीचा उच्चांक मोडला.

भारतीय यष्टिरक्षकाने या प्रकारात नोंदविलेली ही सर्वोच्च धावसंख्या ठरली. यापूर्वी धोनीने २०१७ मध्ये बंगळूरमध्ये इंग्लंडविरुद्ध ५६ धावांची खेळी केली होती.(ताज्या बातम्या मोबाईलवर मिळवा, 'सकाळ'चे App डाऊनलोड करा)याशिवाय, २२ वर्षांचा होण्यापूर्वी या प्रकारात दोन अर्धशतके काढलेला पंत पहिलाच भारतीय फलंदाज ठरला.

दीपकही लक्षवेधी
दीपक चहरने ३-१-४-३  अशी कामगिरी केली. भारतातर्फे या प्रकारातील षटकामागे १.३३ धावा हा दुसऱ्या क्रमांकाचा इकॉनॉमी रेट ठरला. भुवनेश्‍वर कुमारने २०१४ मध्ये ढाक्‍यात ३ षटकांत ३ धावा दिल्या होत्या. त्याचा षटकामागे एका धावेचा इकॉनॉमी रेट सर्वोत्तम आहे.

पाकचा उच्चांकही पार
भारताने वेस्ट इंडीजला सलग सहाव्या टी-२० सामन्यात हरविले. याबरोबरच भारताने विंडीजवरील सलग पाच विजयांचा पाकिस्तानचा उच्चांक मोडला. भारताने यापूर्वी २०१८-१९ मोसमात मायदेशातील मालिकेत ३-० असे धवल यश संपादन केले होते.

...आणि विंडीजचा नीचांक
वेस्ट इंडीजला टी-२० मध्ये ११३ सामन्यांत ५७वा पराभव पत्करावा लागला. यामुळे सर्वाधिक पराभवांच्या नीचांकाशी बरोबरी झाली. बांगलादेशचे ८५ सामन्यांत ५७ पराभव आहेत. यामध्ये टाय होऊन सुपर ओव्हरमध्ये निकाल लागलेल्या लढतींचा समावेश नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com