Rishabh Pant: ऋषभ पंतच्या अपघाताचं कारण अखेर आलं समोर

भारतीय यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतचा शुक्रवारी कार अपघात झाला. त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे.
rishabh pant
rishabh pant esakal

भारतीय यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतचा शुक्रवारी कार अपघात झाला. त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. त्याच्या अपघाताचे अनेक फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. दरम्यान, त्याच्या अपघाताचा खरं कारण समोर आलं आहे. (Rishabh Pant Car Accident ddca director shyam sharma Indian cricketer)

दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनची (DDCA) एक टीमही पंतला भेटण्यासाठी पोहोचली आहे. दरम्यान, ऋषभ पंतने डीडीसीएचे संचालक श्याम शर्मा यांची भेट घेऊन नवा खुलासा केला आहे. श्याम शर्मा यांनी ही माहिती एजन्सीला दिली आहे.

rishabh pant
Rishabh Pant: "फक्त ५-६ सेकंद उशीर झाला असता तर पंत आज आपल्यात..." ड्रायव्हरने सांगितली सगळी कहाणी

श्याम शर्मा यांनी ऋषभ पंतची भेट घेतली तेव्हा त्याची प्रकृती जाणून घेतली, अपघात कसा झाला? त्यावरही बोललो. त्यावर पंत यांनी खड्डा समोर आल्याचा खुलासा केला. त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाला.

rishabh pant
Rishabh Pant car accident : 'वहिनी ऋषभला भेटायला निघाल्या की काय?' उर्वशी थेट विमानतळावर

श्याम शर्मा यांनी सांगितले की, ऋषभ पंतला सध्या एअरलिफ्ट करण्याची गरज नाही. त्याला सध्या दिल्लीला हलवले जाणार नाही. ऋषभ पंतला लिगामेंट ट्रीटमेंटसाठी लंडनला न्यावे लागले तर त्याचा निर्णय बीसीसीआय घेईल. ऋषभ पंतला कुठेही हलवण्याचा निर्णय बीसीसीआय घेईल.

rishabh pant
Rishabh Pant Accident: ऋषभ पंतवर होणार गुन्हा दाखल? DGPनी दिली अपडेट

सध्या ऋषभ पंतवर डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. पंतच्या डोक्याला आणि पायाला सर्वाधिक दुखापत झाल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्या मेंदू आणि मणक्याचे एमआरआय स्कॅनही करण्यात आले. ज्याचा अहवाल समोर आला आहे. या अहवालामुळे चाहत्यांना आणि खुद्द पंतला मोठा दिलासा मिळाला आहे. रिपोर्ट नॉर्मल आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com