Rishabh Pant Accident: ऋषभ मदतीसाठी ओरडत होता पण पाहणारे पैसे गोळा करत व्हिडिओ काढत होते

Rishabh Pant Accident
Rishabh Pant Accident

Rishabh Pant Accident : भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंत शुक्रवारी सकाळपासून चर्चेत आहे. त्याचे कारण म्हणजे त्याचा आज कार अपघात झाला. पंत दिल्लीहून रुरकी येथील त्यांच्या घरी जात असताना त्यांच्या कारला अपघात झाला. पंतच्या डोक्याला आणि पायाला दुखापत झाली असून सध्या त्याच्यावर डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान पंतचा एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये तो रक्ताने माखलेला दिसत आहे. मात्र तो थोडा रागावलेलाही दिसला.

Rishabh Pant Accident
Rishabh Pant Accident : टीम इंडियाचा स्टार ऋषभ पंतच्या गाडीचा अपघात; डोक्याला झाली जबर दुखापत

ऋषभ पंतची गाडी खूप वेगात होती आणि याच दरम्यान त्याचा डोळा लागला. या कारणामुळे पंतची गाडी दुभाजकावर चढून पलीकडे जाऊन उलटली. यानंतर यांच्या कारला आग लागली. कसातरी जीव वाचवून पंत गाडीतून बाहेर पडला. यावेळी तिथे उभ्या असलेल्या लोकांनी पंतला मदत केली.

Rishabh Pant Accident
Rishabh Pant Accident: एक डुलकी ऋषभ पंतच संपूर्ण करिअर संपवणार?

यादरम्यान व्हिडीओ बनवत एक व्यक्ती पंतच्या पुढे आला. व्हिडिओ बनवत असल्याचे पाहताच पंतला थोडा राग आला जो त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. ऋषभ पंत कदाचित त्या व्यक्तीला सांगत होते की, तुम्ही व्हिडिओ का बनवत आहात. त्यानंतर त्या व्यक्तीने व्हिडिओ बंद केला.

वृत्तांवर विश्वास ठेवला तर ऋषभ पंत त्याच्यासोबत कारमध्ये सुमारे तीन ते चार लाख रुपये होते. घटनेनंतर त्याच्याकडे असलेले सर्व पैसे रस्त्यावर पडले होते. पंत वेदनेने ओरडत होता. पण यावेळी काही लोक होते ज्यांनी ऋषभला मदत करण्याऐवजी त्याचे पैसे लुबाडण्यात आणि ते आपल्या खिशात भरण्यात जास्त रस दाखवला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com