Rishabh Pant : अखेर पंतचे नशिब उघडले! झिम्बाब्वेविरूद्ध DK बसला बेंचवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rishabh Pant

Rishabh Pant : अखेर पंतचे नशिब उघडले! झिम्बाब्वेविरूद्ध DK बसला बेंचवर

IND vs ZIM T20 World Cup 2022 : भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील सुपर-12 च्या गट-2 मधील हा शेवटचा सामना आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याने प्लेइंग-11 मध्ये एक बदल केला आहे. दिनेश कार्तिकला बेंचवर बसला आहे, तर त्याच्या जागी आज ऋषभ पंत विकेटकीपिंग करताना दिसणार आहे.

भारतीय संघाने आतापर्यंत गटातील 4 पैकी तीन सामने जिंकले आहेत. यादरम्यान पाकिस्तान, नेदरलँड आणि बांगलादेशचा पराभव झाला आहे. तर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केवळ पराभवाचा सामना करावा लागला आहे. दुसरीकडे झिम्बाब्वे संघ आधीच स्पर्धेतून बाहेर पडला आहे.

हेही वाचा: BAN vs PAK : नेदरलँडच्या जीवावर पाकिस्तान बाजीराव! रडत खडत गाठली सेमी फायनल

भारतीय संघ : केएल राहुल, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, ऋषभ पंत (विकेटकीपर), अक्षर पटेल, आर अश्विन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग.