Rishabh Pant Health Update : पंतच्या प्रकृती विषयी आली मोठी अपडेट; या आठवड्यात कोकिलाबेन रूग्णलयात... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rishabh Pant Health Update

Rishabh Pant Health Update : पंतच्या प्रकृती विषयी आली मोठी अपडेट; या आठवड्यात कोकिलाबेन रूग्णलयात...

Rishabh Pant Health Update : भारताचा विकेटकिपर बॅट्समन ऋषभ पंतच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट आली आहे. ऋषभ पंतच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाल्या होत्या. आता त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत असून लवकरच त्याला कोलिलाबेन रूग्णालयातून घरी पाठवण्यात येणार आहे.

पंता 30 डिंसेबरला भीषण अपघात झाला होता. या अपघातानंतर त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता जवळपास एक महिना रूग्णालयात राहिल्यानंतर पंतला या आठवड्यात घरी सोडण्यात येणार आहे.

पंतच्या प्रकृतीबाबत बीसीसीआयचे एक वरिष्ठ अधिकारी म्हणाले की, 'ऋषभ पंत चांगल्या प्रकारे रिकव्हर होत आहे. त्याच्या मेडिकल टीम कडून चांगली बातमी आली आहे. पहिली शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून त्याला या आठवड्यात घरी सोडण्यात येईल.'

बीसीसीआय अधिकारी पुढे म्हणाले की, 'पंतला जवळपास एका महिन्यानंतर पुन्हा एका शस्त्रक्रियेला सामोरे जावे लागणार आहे. दुसरी शस्त्रक्रिया कधी करायची हे डॉक्टर ठरवतील. बीसीसीआयची मेडिकल टीम, डॉक्टर परदीवाला आणि रूग्णालयाशी सातत्याने संपर्कात आहेत. आम्हाला आशा आहे की पंत लवकरच मैदानावर परतेल.

ऋषभ पंत अपघात आणि उपचारांचा घटनाक्रम

30 डिसेंबर : दिल्लीवरून रूरकीला जाताना पंतच्या मर्सिडीज SUV ला अपघात. या अपघातात पंत थोडक्यात वाचला

30 डिसेंबर : पंतच्या कपाळावर जखम झाली होती. जवळच्याच रूग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. त्याच्या मनगटाला आणि गुडघ्याला देखील दुखापत झाली होती.

30 डिसेंबर : प्राथमिक उपचारानंतर त्याला देहरादून येथील मॅक्स रूग्णालयात दाखल करण्यात आले.

4 जानेवारी : बीसीसीआयने पंतला आराम मिळावा यासाठी मॅक्स रूग्णालयातून मुंबईतील कोकिलाबेन रूग्णलयात हलवले.

4 जानेवारी : बीसीसीआयच्या मेडिकल टीमने डॉक्टर दिनशॉ परदीवाला यांच्यासह मिळून पंतवर उपचार सुरू केले.

7 जानेवारी : ऋषभ पंतने डॉ. परदीवाला यांच्या मार्गदर्शनाखाली गुडघ्याच्या पीसीएल आणि एमसीएल लिगामेंटवर शस्त्रक्रिया करण्यात आली.

16 जानेवारी : ऋषभ पंतने कोकिलाबेन रूग्णालयात रिहॅबिलिटेशन सुरू असल्याचा फोटो सोशल मीडियावरून शेअर केला.

(Sports Latest News)

हेही वाचा : T+1 Settlement मुळे वाढेल शेअर बाजारातली उलाढाल