Rishabh Pant : 'पंतला पहिली पसंती नाही', राहुल द्रविडचा खळबळजनक खुलासा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rishabh Pant

Rishabh Pant : 'पंतला पहिली पसंती नाही', राहुल द्रविडचा खळबळजनक खुलासा

Rishabh Pant India vs Pakistan Asia Cup 2022 : आशिया चषक स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघाच्या पहिल्याच सामन्यात ऋषभ पंतला पाकिस्तानविरुद्धच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान न मिळाल्याची जोरदार चर्चा रंगली होती. टीम इंडियाने आपल्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा 5 विकेट्सने तर दुसऱ्या सामन्यात हाँगकाँग संघाचा 40 धावांनी पराभव केला. आता सुपर-4 मधील भारत आणि पाकिस्तान यांच्यात 4 सप्टेंबरला सामना होणार आहे. मात्र याआधी भारतीय प्रशिक्षक राहुल द्रविडने ऋषभ पंत बद्दल मोठा खुलासा केला आहे.

हेही वाचा: Video : राशिद खानची श्रीलंकेच्या खेळाडू सोबत भर मैदानात भांडण

भारत आणि पाकिस्तान सामन्यापूर्वी प्रशिक्षक द्रविडने पत्रकार परिषदेत स्पष्ट केले की, पंत सध्या टी-20 मधला पहिला पसंतीचा यष्टिरक्षक नाही. आम्ही मैदानाची परिस्थिती आणि विरोधी पक्षानुसार खेळतो आणि त्यानुसार सर्वोत्तम इलेव्हन निवडतो. प्रत्येक स्थानासाठी प्रथम पसंतीची प्लेइंग इलेव्हन असू शकत नाही. त्यादिवशी पाकिस्तानविरुद्ध आम्हाला वाटले की आमच्यासाठी दिनेश कार्तिक हाच योग्य पर्याय आहे. पंतशिवाय भारतीय संघात दिनेश कार्तिकच्या रूपाने एक वरिष्ठ यष्टीरक्षकही आहे, जो दोन्ही सामन्यात संघाचा भाग होता.

हेही वाचा: Ravindra Jadeja : आशिया कपनंतर गुडघा दुखापतीमुळे जडेजा T-20 World Cup मधूनही बाहेर!

ऋषभ पंतने कसोटी क्रिकेटमध्ये आणि एकदिवसीय क्रिकेटमध्येही भारतीय प्लेइंग इलेव्हनमध्ये आपले स्थान पक्के केले आहे. येथील तो नंबर वन किपर आहे, परंतु दिनेश कार्तिकच्या T20 मध्ये पुनरागमनामुळे त्याचे स्थान अडचणीत आले आहे. विशेषतः त्याचे आकडेही या फॉरमॅटमध्ये फारसे चांगले नाहीत. 2022 मध्ये पंतने 13 T20 आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये केवळ 260 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये त्याचे एक अर्धशतक आहे, परंतु स्ट्राइक रेट फक्त 135 आहे.

Web Title: Rishabh Pant Not First Choice As A Wicketkeeper Rahul Dravid Sports Cricket India Vs Pakistan Asia Cup 2022

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..