रिषभ पंतच भारताचं भविष्य : कोहली

वृत्तसंस्था
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

विंडीजविरुद्ध झालेल्या पहिल्या दोन ट्वेंटी20 सामन्यात अपयशी ठरलेल्या रिषभ पंतने तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात पंतला सूर गवसला आणि त्याने मॅटविनिंग खेळी केली. त्याच्या या खेळीवर खूश झालेल्या कर्णधार विराट कोहलीने पंतच भारतीय संघाचे भविष्य आहे असे म्हणत त्याचे कौतुक केले आहे. 

फ्लोरिडा : विंडीजविरुद्ध झालेल्या पहिल्या दोन ट्वेंटी20 सामन्यात अपयशी ठरलेल्या रिषभ पंतने तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात पंतला सूर गवसला आणि त्याने मॅटविनिंग खेळी केली. त्याच्या या खेळीवर खूश झालेल्या कर्णधार विराट कोहलीने पंतच भारतीय संघाचे भविष्य आहे असे म्हणत त्याचे कौतुक केले आहे. 

''आम्ही त्याच्याकडे संघाचे भविष्य म्हणून बघत आहोत. त्याच्याकडे खूप कौशल्य आहे. त्याच्यावर फक्त दडपण न देता त्याला थोडा वेळ देण्याची गरज आहे. त्याने सुरवात केल्यापासून खूप प्रगती केली आहे. त्याने आजप्रमाणेच सामना जिंकून देण्याची गरज आहे. तो नेहमी असाच खेळत राहिला तर तो भारतासाठी नक्कीच चमकेल,'' अशा शब्दांत कोहलीने त्याची बाजू घेत त्याचे कौतुक केले आहे.  

विंडीजविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने 42 चेंडूमध्ये 65 धावांची खेळी केली. यामध्ये त्याने चार चौकार आणि चार षटकार मारले. धोनीच्या अनुपस्थितीत आता संघाच्या यष्टीरक्षणाची जबाबदारी पंतकडेच जाणार यात काही शंका नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rishabh Pant is our future says Virat Kohli