Rishabh Pant : योगा आणि जिम्नॅस्टिकच्या पार्श्वभूमीमुळे पंतची रिकव्हरी लवकर

जिम्नॅस्टिक खेळाडू असल्याची पार्श्वभूमी आणि मानसिकता सक्षमता यामुळे जीवघेण्या अपघातानंतरही रिषभ पंतची रिकव्हरी अपेक्षेपेक्षा लवकर झाली, असे त्याच्यावर उपचार करणारे आणि तंदुरुस्तीसाठी मेहनत घेणाऱ्या सर्वांचे मत आहे.
rishabh Pant recovery is quick due to his background in yoga and gymnastics
rishabh Pant recovery is quick due to his background in yoga and gymnasticssakal

नवी दिल्ली : जिम्नॅस्टिक खेळाडू असल्याची पार्श्वभूमी आणि मानसिकता सक्षमता यामुळे जीवघेण्या अपघातानंतरही रिषभ पंतची रिकव्हरी अपेक्षेपेक्षा लवकर झाली, असे त्याच्यावर उपचार करणारे आणि तंदुरुस्तीसाठी मेहनत घेणाऱ्या सर्वांचे मत आहे.

डिसेंबर २०२२ मध्ये पंतच्या गाडीला अतिशय भयावह अपघात झाला होता. त्यातून जिवंत बाहेर येणे हे त्याच्यासाठी पूर्नजन्मसारखेच आहे. आता १५ महिन्यानंतर तो क्रिकेटच्या मैदानावर पुन्हा परतत आहे. २२ मार्च पासून सुरू होणाऱ्या आयपीएलमध्ये तो दिल्ली संघातून केवळ खेळणारच नसून नेतृत्वही करणार आहे.

पंतची मानसिक सक्षमता आणि प्रचंड इच्छाशक्ती त्यामुळे त्याने आपल्या तंदुरुस्तीसाठी १०० टक्यांहून अधिक मेहनत घेतली, असे थुलासी युवराज यांनी बीसीसीआयच्या टीव्हीशी बोलताना सांगितले.

पंत राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत आला तेव्हा त्याला पुन्हा मैदानात उतरण्यासाठी किमान दोन वर्षे लागतील, असा आमचा अंदाज होता; परंतु लहान वयात त्याने केलेल्या योगाचा त्याच्या या रिकव्हरीसाठी फार मोलाचा ठरला,

असे मत राष्ट्रीय क्रिकेट अकादमीतील स्टेंथ आणि कंडिशनिंगतज्ज्ञ निशांता बोर्डोली यांनी व्यक्त केले. जिम्नॅस्टिक खेळाची असलेली पार्श्वभूमीही पंतच्या या प्रगतीसाठी निर्णायक ठरली, कारण तंदुरुस्त होत असताना त्याच्या शरीरातील ताकद आपोआप येत गेली, असेही ते म्हणाले.

रिकव्हरी सुरू होत असताना त्याचे शरीर उत्तम साथ देत होते. कोणती हालचाल करायची आहे, याचे संकेत शरीराला मिळत होते. त्यामुळे उभे राहात असताना जर त्याला त्रास होत होता; परंतु लगेचच सावरून तो पुन्हा उभा राहत होता. सुरुवातीच्या काळातील ही परिस्थिती होती, असे बोर्डोली म्हणाले.

पंतच्या तंदुरुस्तीबाबत बोर्डोली पुढे म्हणतात, त्याच्या काही अवयवांची ताकद नव्याने निर्माण झाली आहे. अपघातातून अशाप्रकारे रिकव्हरी होण्यासाठी फार मोठा कालावधी लागतो, कारण स्नायूंची ताकद आणि हालचाली यांच्या संवेदना मेंदूपर्यंत जात असतात; परंतु पंतने लहान वयात केलेला योगा आणि जिम्नॅस्टिकची पार्श्वभूमी त्याच्यासाठी वरदान ठरली.

अपघातानंतर पंतवर शस्त्रक्रिया आणि उपचार करणारे ऑर्थपेडिकतज्ज्ञ दिनशॉ पार्डीवाला यांनी पंतला पुन्हा मैदानात उतरवण्यासाठी घेतलेल्या मेहनतीबद्दल राष्ट्रीय क्रिकेट अकादमीतील सर्व स्टाफ आणि इतर सदस्यांचे आभार मानले. पंतला मानसिक आधार देणाऱ्या खेळाडूंचेही त्यांनी कौतुक केले. सहा महिने अगोदरच पंत तंदुरुस्त होऊन मैदानात उतरणार आहे, असे पार्डिवाला म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com