Sports News: आता रायझिंग स्टार्स करंडकाचे लक्ष्य ;तिलक वर्मा भारत अ संघाचा कर्णधार; रविवारी पाकशी सामना

Rising Stars Asia Cup : १९ ते २९ नोव्हेंबरदरम्यान होणाऱ्या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान अ संघ आमनेसामने येणार असून, तिलक वर्माच्या नेतृत्वाखाली अभिषेक शर्मा आणि वैभव सूर्यवंशी खेळणार आहेत.
India's Rising Stars squad, led by Tilak Varma, will compete in the Asia Cup tournament in Doha

India's Rising Stars squad, led by Tilak Varma, will compete in the Asia Cup tournament in Doha

esakal

Updated on: 

दोहा ,: नुकत्याच झालेल्या १९ वर्षांखालील आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत भारताने अखेरच्या चेंडूवर पाकिस्तानचा पराभव करून विजेतेपद पटकावले. आता रायझिंग स्टार्स आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेचे लक्ष्य भारतीय संघाने बाळगले आहे. उद्यापासून (१९ नोव्हेंबर) सुरू होणाऱ्या या स्पर्धेत रविवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यात साखळी सामना रंगणार आहे. यंदाची ही स्पर्धा ५० षटकांच्या स्वरूपात खेळवली जाणार आहे.

Loading content, please wait...