शाहजारने संपविला पदक दुष्काळ

वृत्तसंस्था
बुधवार, 25 एप्रिल 2018

मुंबई - शाहजार रिझवी याने दुसऱ्या विश्‍वकरंडक नेमबाजी स्पर्धेतील भारताचा पदक दुष्काळ अखेर संपवला. त्याने १० मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत रौप्यपदक जिंकले, पण त्याला ०.२ गुणांनी सुवर्णपदक हुकल्याची हूरहूर असेल. 

शाहजारने मेक्‍सिको विश्‍वकरंडक स्पर्धेतील सुवर्णयशाची पुनरावृत्ती करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, पण रशियाच्या आर्लेम चेरनोऊसॉव याने शाहजारला २४० गुणांचा वेध घेत मागे टाकले. पहिल्या दोन दिवशी भारतीयांचे ब्राँझ थोडक्‍यात हुकले होते, या पार्श्‍वभूमीवर शाहजारचे रौप्य सुखावणारे आहे. 

राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेता जितू राय तसेच ओमप्रकाश मिथारवाल यांचाही स्पर्धेत सहभाग होता. पात्रता फेरीत शाहजारने ५८२ गुणांसह सहावा क्रमांक मिळविला. ओमप्रकाशची (५८१, ११ वे स्थान) अंतिम फेरी थोडक्‍यात हुकली. राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेता जितू राय (५७५) ३८ व्या स्थानावर गेला. अंतिम फेरीत शाहजार पहिल्या फेरीनंतर अव्वल होता, पण त्यानंतर त्याची कामगिरी खालावत गेली. अंतिम टप्प्यात सलग तीन शॉटस्‌ अचूक लक्ष्यापासून दूर राहिल्याने तो चौथ्या क्रमांकावर गेला, पण अखेरच्या चार शॉटस्‌मध्ये ४१.२ गुण घेत त्याने रौप्य जिंकले. 

पुरुषांच्या ट्रॅपमध्ये मानवजित सिंग संधूने १२५ पैकी ११७ गुण पटकावले, तरीही तो २४ वा आला. क्‍यानन चेनाई (११५) यास ३८ व्या तर झोरावर सिंग संधूला (११४) ४१ व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

Web Title: Rizvi wins air pistol silver