मुख्य प्रशिक्षकाच्या शर्यतीत भारताचा 'हा' माजी खेळाडूही

Robin singh enters the race for coach of Team India
Robin singh enters the race for coach of Team India

नवी दिल्ली : भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत रॉबीन सिंग यांनीही उडी घेतली आहे. भारतीय संघातील चपळ क्षेत्ररक्षक म्हणून लौकिक मिळवणाऱ्या रॉबिन सिंग यांनी गेल्या 15 वर्षांत विविध संघाच्या प्रशिक्षकपदांची जबाबदारी सांभाळलेली आहे आणि विविध 10 विजेतेपदेही मिळवलेली आहेत. 

रॉबिन सिंग 2008 ते 09 या काळात भारताचे क्षेत्ररक्षक प्रशिक्षक होते. त्या काळात भारताने इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकलली होती. तसेच पहिल्या वहिल्या टी-20 विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेचेही विजेतेपद जिंकले होते. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियात पहिल्यांदा एकदिवसीय मालिका जिंकली होती. 

भारताच्या 19 वर्षांखालील आणि अ संघाच्या प्रशिक्षकपदापासून त्यांनी आपल्या प्रशिक्षकपदाच्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. मुंबई इंडियन्सचे ते सहाय्यक प्रशिक्षक होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये बार्बाडोस आणि त्रिनिनादने विजेतेपद मिळवलेले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com