स्लेजिंगचा किस्सा; उथप्पाने घेतला होता हेडनशी पंगा

त्यानंतर दोन्ही संघात स्लेजिंगचा प्रकार मोठ्या प्रमाणात वाढला. भारतीय संघातील प्रत्येक खेळाडू कांगारुंच्या संघातील खेळाडूंना त्यांच्या भाषेतच उत्तर द्यायचा, असेही रॉबिन उथप्पाने म्हटले आहे.
robin uthappa and matthew hayden
robin uthappa and matthew hayden GOOGLE

भारतीय संघाचा फलंदाज रॉबिन उथप्पा (robin uthappa) याने भारत (India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) दरम्यानच्या लढतीवेळीच्या स्लेंजिगसंदर्भात मनमोकळ्या गप्पा मारल्या. स्लेजिंगमुळे ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज मॅथ्यू हेडनने (matthew hayden) अबोला धरला होता, असा किस्साही त्यांनी शेअर केलाय. जवळपास दोन ते तीन वर्ष मॅथ्यू हेडन आणि रॉबिन उथप्पा यांच्यात अबोला होता. भारतीय संघाने 2000 मध्ये ऑस्ट्रेलियाला त्यांच्या घरच्या मैदानात 2-1 असे पराभूत केले होते. त्यानंतर दोन्ही संघात स्लेजिंगचा प्रकार मोठ्या प्रमाणात वाढला. भारतीय संघातील प्रत्येक खेळाडू कांगारुंच्या संघातील खेळाडूंना त्यांच्या भाषेतच उत्तर द्यायचा, असेही रॉबिन उथप्पाने म्हटले आहे. (robin uthappa and matthew hayden sledging incident india aus matches)

robin uthappa and matthew hayden
Italian Open : नदाल-इगाचा जलवा!

2015 मध्ये टीम इंडियासाठी अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळणारा रॉबिन उथप्पा युट्यूब कार्यक्रमात म्हणाला की, भारत आणि ऑस्ट्रेलियातील मॅचेसवेळी स्लेंजिंगचा खेळ चांगलाच रंगायचा. गौतम गंभीर आणि मी अँड्र्यू सायमंड्स, मिचेल जॉनसन आणि ब्रॅड हॉज यांना जशास तसे उत्तर दिले होतो. मॅथ्यू हेडनसोबतचा वाद चांगलाच टोकाला गेला होता, असेही रॉबिन उथप्पा म्हणाला. एक फलंदाज म्हणून मॅथ्यू हेडनला आदर्श मानतो. वॉकिंग शॉट मी त्याची फलंदाजी पाहूनच शिकलो, पण त्याच्यासोबत झालेला वाद अजूनही विसरलेलो नाही.

robin uthappa and matthew hayden
धोनीनं केली जडेजाची कॉपी, व्हिडिओ घालतोय धुमाकूळ

मॅथ्यू हेडन बॅटिंग करत असताना जे मला बोलला ते मी जाहीरपणे सांगू शकत नाही. ते सहन न झाल्याने मी देखील त्याला प्रत्युत्तर दिले. याचा त्याला इतका राग आला की त्याने माझ्याशी बोलणेच बंद केले. जवळपास 2-3 वर्षे तो माझ्यासोबत बोलतच नव्हता, असे रॉबिन उथप्पाने सांगितले. उथप्पाने टीम इंडियाकडून 46 वनडे आणि 13 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com