Robin Uthappa : सीएसकेच्या रॉबिन उथप्पाने घेतली निवृत्ती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Robin Uthappa Announce Retirement From All Forms Of Cricket

Robin Uthappa : सीएसकेच्या रॉबिन उथप्पाने घेतली निवृत्ती

Robin Uthappa Retirement : भारताचा धडाकेबाज फलंदाज रॉबिन उथप्पाने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केली आहे. त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली. गेल्या आयपीएल हंगामात चेन्नई सुपर किंग्जकडून खेळणाऱ्या रॉबिन उथप्पाने सर्व क्रिकेट फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली आहे. रॉबिन उथप्पा आपल्या पोस्टमध्ये लिहितो की, 'माझ्या देशाचे आणि कर्नाटकचे प्रतिनिधित्व करायला मिळाले हा मी माझा सन्मान समजतो. असो सर्व चांगल्या गोष्टी कधी ना कधी संपुष्टात येतात. मी भारतीय क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे.'

रॉबिन उथप्पा हा भारताच्या 2007 च्या पहिल्या टी 20 वर्ल्डकप विजेत्या संघाचा एक भाग होता. त्याने पाकिस्तानविरूद्धच्या बॉल आऊटमध्ये गेलेल्या सामन्यात भारताला विजय मिळवून देण्यात मोठी भुमिका बजावली होती. यानंतर त्याने केलेल्या सेलिब्रेशनमुळे सर्व क्रिकेट चाहत्यांची मने जिंकली होती. वेगवान गोलंदाजाला चालत येऊन बॉलर्स बॅक फटके मारण्यात त्याचा हातखंडा होता.

रॉबिन उथप्पाने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दित 46 वनडे सामने आणि 13 टी 20 सामने खेळले आहेत. वनडेमध्ये त्याने 25.94 च्या सरासरीने 934 धावा केल्या. यात सहा अर्धशतकांचा देखील समावेश आहे. तर आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमध्ये उथप्पाने 24.9 च्या सरासरीने 249 धावा केल्या. यात एका अर्धशतकाचा समावेश आहे.

याचबरोबर उथप्पाने आयपीएलमद्ये 205 सामने खेळले आहेत. त्यात त्याने 27.51 च्या सरासरीने 4 हजार 952 धावा केल्या आहेत. यात 27 अर्धशतकांचा देखील समावेश आहे. 88 ही त्याची आयपीएलमधील सर्वोच्च धावसंख्या आहे.