Rohan Bopanna Miami Open : रोहन बोपन्नाने इतिहास रचला; अशी कामगिरी करणारा लिएंडर पेस नंतरचा ठरला दुसरा भारतीय टेनिसपटू

Rohan Bopanna
Rohan Bopanna esakal

Rohan Bopanna Miami Open : भारताचा स्टार टेनिसपटू रोहिन बोपन्ना आणि त्याचा ऑस्ट्रेलियन पार्टनर मॅथ्यूज इबडेन रिचर्ड यांनी मियामी ओपन पुरूष दुहेरीची अंतिम फेरी गाठली आहे. त्यांनी मार्सेल ग्रॅनोलर्स आणि होरासियो जेबालोसचा सरळ सेटमध्ये पराभव करत अंतिम फेरी गाठली. ऑस्ट्रेलिया ओपनमध्ये विजेतेपद पटकावलेल्या बोपन्ना आणि इबडेन यांनी स्पेन अन् अर्जेंटिनाच्या खेळाडूंचा 6-1, 6-4 असा सरळ सेटमध्ये पराभव केला.

Rohan Bopanna
IPL 2024 : दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ...? आयपीएल 2024 मधील सर्वात प्रसिद्ध संघाच्या यादीत मुंबईची झाली घसरण

मियामी ओपन पुरूष दुहेरीच्या अंतिम सामन्यात बोपन्ना आणि मॅथ्यूज हे क्रोएशियाच्या इवान डोडिग आणि अमेरिकेच्या ऑस्टिन क्राजिसेक या जोडीशी भिडणार आहेत. त्यांनी दुसऱ्या सेमी फायनलमध्ये केविन आणि टिम पुट्ज या जोडीचा 6-4, 6-7(7), 10-7 असा पराभव केला होता.

बोपन्नाला दुबई ओपनमध्ये क्वार्टर फायनलमध्ये पराभव सहन करावा लागला होता. तो इंडियन वेल्स मास्टरच्या 32 व्या फेरीतूनच बाहेर गेला होता. त्यानंतर मॅथ्यूज आणि बोपन्ना हे रँकिंगमध्ये दुसऱ्या स्थानावर घसरले होते. आता सोमवारी अपडेट होणाऱ्या रँकिंगमध्ये ते पुन्हा अव्वल स्थानावर पोहचणार आहेत.

Rohan Bopanna
IPL 2024 RCB vs KKR Live Score : केकेआरने आरसीबीच्या मुसक्या आवळल्या, दिला चौथा धक्का

ऑस्ट्रेलिया ओपन जिंकल्यानंतर 44 वर्षाच्या बोपन्नाने एटीपी रँकिंगध्ये अव्वल स्थान पटकावलं होतं. तो रँकिंगमध्ये अव्वल स्थान पटकावणारा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला होता. बोपन्ना आपली 14 वी एटीबी मास्टर्स 1000 ची फायनल खेळणार आहे. ही त्याची एटीपी टूरची 63 वी फायनल असणार आहे.

बोपन्नाने आतापर्यंत 25 दुहेरी टायटल जिंकले आहेत. मॅथ्यूज आणि बोपन्ना जोडीची ही एटीपी मास्टर्स 1000 ची पाचवी फायनल आहे. बोपन्नाने अजून एक रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. लिएंडर पेस नंतर बोपन्ना हा सर्व 9 एटीपी मास्टर्स स्पर्धेत फायनल गाठणारा दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com