Junior Hockey Team : ज्युनिअर हॉकी संघाच्या युरोप दौऱ्यासाठी रोहित कर्णधार

हॉकी इंडियाने २० ते २९ मेदरम्यान होणाऱ्या युरोप दौऱ्यासाठी ज्युनिअर हॉकी संघ जाहीर केला आहे.
Junior Hockey Team
Junior Hockey Teamsakal

नवी दिल्ली : हॉकी इंडियाने २० ते २९ मेदरम्यान होणाऱ्या युरोप दौऱ्यासाठी ज्युनिअर हॉकी संघ जाहीर केला आहे. या दौऱ्यात भारतीय संघ बेल्जियम, जर्मनी आणि नेदरलँड्‌स येथील क्लब संघांशी पाच सामने खेळणार आहे.

नवोदित खेळाडूंना अनुभव देण्याच्या कार्यक्रमांतर्गत हा दौरा होणार आहे. यातील पहिला सामना २० मे रोजी बेल्जियममध्ये अँटवर्प येथे होणार आहे तर पुढचा सामना नेदरलँडमधील ब्रेदा या क्लबशी २२ मे रोजी होईल.

भारताच्या या ज्युनिअर हॉकी संघाचे नेतृत्व रोहितकडे देण्यात आले आहे. तर श्रद्धानंद तिवारी उपकर्णधार असेल. प्रिंसदीप सिंग आणि बिक्रमजीत सिंग हे गोलरक्षक असतील. योगेंमबर रावत, अनमोल इक्का, मनोज यादव आणि तलिम बात्रा यांच्यासह रोहित आणि श्रद्धानंद तिवारी बचाव खेळाडूंत असतील.

Junior Hockey Team
Hockey India vs Australia: भारतीय हॉकी संघावर व्हाईटवॉशची नामुष्की ; ऑस्ट्रेलियाचा अखेरच्या लढतीत ३-२ ने विजय

अंकित पाल, रोहशन कुंजर, बिपिन बिल्लावर्ना, मुकेश टोप्पो, मनमीत सिंग आणि वचन एच.ए. हे खेळाडू मधल्या फळीची जबाबदारी सांभाळतील. तर सौरभव अनंद कुशवाह, अर्शदीप सिंग, गुरज्योत सिंग, मोहम्मद कोनैन दाद, दिलराज सिंग आणि गुरसेवक सिंग हे आक्रमक फळीत खेळतील.

आम्ही जोरदार सराव करत आहोत आणि त्याद्वारे एकमेकांचा खेळ समजावून घेत आहोत. एकत्रितपणे खेळताना आमच्या अनुभवात चांगली प्रगती होईल, असे मत कर्णधार रोहितने व्यक्त केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com