IND Vs SL : 'असं होणार नाही, तुला वेड लागलं...', शुभमन गिलने रोहित शर्माला काय विचारलं, ज्यामुळे 'हिटमॅन' संतापला?

Rohit Sharma Angry Shubman Gill Asia Cup 2023 Final IND Vs SL
Rohit Sharma Angry Shubman Gill Asia Cup 2023 Final IND Vs SL sakal

Rohit Sharma Angry Shubman Gill Asia Cup 2023 Final IND Vs SL : भारत आणि श्रीलंका यांच्यात अंतिम सामना आज खेळल्या जाणार आहे. या अंतिम सामन्यापूर्वी रोहित शर्मा आणि शुभमन गिलचा एक व्हिडिओ चर्चेचा विषय बनला आहे. भारतीय संघाचा कर्णधार रोहित लिफ्टच्या बाहेर उभा राहून त्याचा सलामीवीर शुभमन गिलशी बोलत आहे.

यादरम्यान शुभमन गिलने असे काही म्हणाला जे कदाचित रोहित शर्माला आवडले नसेल. यावर भारतीय कर्णधार आपल्याच स्टाईलमध्ये म्हणाला- असं होणार नाही, तुला वेड लागलं आहे का?

Rohit Sharma Angry Shubman Gill Asia Cup 2023 Final IND Vs SL
IND vs SL : भारत विरुद्ध श्रीलंका फायनल सामना पावसामुळे रद्द झाली तर कोण होणार 'चॅम्पियन'? जाणून घ्या समीकरण

सोशल मीडियावर युजर्स शुभमन गिल काय बोलले असावेत असा अंदाज लावत आहेत. ज्यावर रोहित शर्माने अशी प्रतिक्रिया दिली. एकाने लिहिले की शुभमन गिल म्हणाला असेल की, रोहित भाई मी काल शतक केले, चला आज पार्टी करूया. दुसरा म्हणतो की, गिल म्हणाला असेल, रोहित भाईने लिफ्ट सोडा, पायऱ्यांवरून खाली जा. यानंतर रोहितने असे उत्तर दिले. यावर अनेक प्रतिक्रिया येत आहे. पण शुभमन गिलने रोहित शर्माला काय विचारलं हे आम्हाला माहित नाही.

Rohit Sharma Angry Shubman Gill Asia Cup 2023 Final IND Vs SL
IND vs SL Playing 11: फायनलमध्ये कर्णधार रोहित टीम इंडियाच्या प्लेइंग-11 करणार मोठे बदल, कोण जाणार बाहेर?

रोहित शर्मा आणि शुभमन गिल हे आशिया कप 2023 मध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करणारे खेळाडू आहेत. गिलने बांगलादेशविरुद्धच्या सुपर 4 च्या शेवटच्या सामन्यात शतक झळकावले होते. दुसरीकडे, रोहितने सलग तीन सामन्यांत तीन अर्धशतके झळकावली आहेत. पण बांगलादेशविरुद्ध त्याला खातेही उघडता आले नाही. अंतिम सामन्यात भारतीय कर्णधार मोठी खेळी खेळण्याचा प्रयत्न करेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com