IND vs SL : भारत विरुद्ध श्रीलंका फायनल सामना पावसामुळे रद्द झाली तर कोण होणार 'चॅम्पियन'? जाणून घ्या समीकरण

IND vs SL : भारत विरुद्ध श्रीलंका फायनल सामना पावसामुळे रद्द झाली तर कोण होणार 'चॅम्पियन'? जाणून घ्या समीकरण

India vs Sri Lanka Asia Cup Final 2023 : आशिया कपचा अंतिम सामना आज भारत आणि श्रीलंका यांच्यात खेळला जाणार आहे. आशिया कपमध्ये आतापर्यंत दोन्ही संघांनी शानदार खेळ दाखवला. श्रीलंकेने सुपर 4 मध्ये पाकिस्तानचा 2 गडी राखून पराभव करून फायनलमध्ये प्रवेश केला आहे, तर दुसरीकडे भारतीय संघाने सुपर 4 मध्ये श्रीलंका आणि पाकिस्तानचा पराभव करून फायनलमध्ये प्रवेश केला आहे.

IND vs SL : भारत विरुद्ध श्रीलंका फायनल सामना पावसामुळे रद्द झाली तर कोण होणार 'चॅम्पियन'? जाणून घ्या समीकरण
IND vs SL Playing 11: फायनलमध्ये कर्णधार रोहित टीम इंडियाच्या प्लेइंग-11 करणार मोठे बदल, कोण जाणार बाहेर?

मात्र, अखेरच्या सुपर 4 सामन्यात भारताला बांगलादेशविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले. आता भारतीय संघ पुन्हा एकदा अंतिम फेरीत श्रीलंकेशी भिडणार आहे. यावेळी श्रीलंकेला पराभूत करणे भारतासाठी निश्चितच अवघड जाणार आहे. पण या संपूर्ण स्पर्धेत पावसाने खेळ खूप खराब केला आहे. अशा स्थितीत अंतिम फेरीतही पावसाची शक्यता आहे. पण पावसामुळे सामना रद्द झाली तर चॅम्पियन कोण होणार हा मोठा प्रश्न आहे.

IND vs SL : भारत विरुद्ध श्रीलंका फायनल सामना पावसामुळे रद्द झाली तर कोण होणार 'चॅम्पियन'? जाणून घ्या समीकरण
Neeraj Chopra : इतिहास रचण्यापासून 0.44 सेंटीमीटरने चुकला नीरज चोप्रा! डायमंड लीग जिंकण्याचं स्वप्न भंगलं

भारत-श्रीलंका फायनलमध्येही पावसाचा धोका

भारत आणि श्रीलंका यांच्यातील अंतिम सामना 17 सप्टेंबर (रविवार) रोजी कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवर खेळवला जाईल. रविवारीही सामन्यादरम्यान पाऊस पडण्याची शक्यता आहे. रविवारी कोलंबोमध्ये पावसाची शक्यता 80 टक्क्यांपर्यंत आहे. AccuWeather च्या अहवालानुसार, 17 सप्टेंबर रोजी दुपारी 1 ते 7 वाजेपर्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामना दुपारी 3 वाजता सुरु होणार आहे.

अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस

17 सप्टेंबरला पावसाची शक्यता असल्यास दुसऱ्या दिवशी सामना खेळवला जाईल. म्हणजेच अंतिम फेरीसाठी एक दिवस राखीव दिवस म्हणून ठेवण्यात आला आहे. अशा स्थितीत 18 सप्टेंबरलाही पाऊस पडेल का? हा प्रश्नही चाहत्यांच्या मनात आहे.

18 सप्टेंबर म्हणजेच राखीव दिवशीही पावसाची शक्यता 69% आहे. अशा परिस्थितीत 17 आणि 18 तारखेला पाऊस पडला आणि सामना पूर्ण होऊ शकला नाही, तर दोन्ही संघांना संयुक्त विजेता घोषित केले जाईल.

सुपर 4 मध्ये पावसाची शक्यता होती, पाऊस पडला पण सर्व सामने पूर्ण झाले. अशा परिस्थितीत भारत आणि श्रीलंका यांच्यातील अंतिम सामनाही पूर्ण होऊन आम्हाला विजेतेपद मिळणे अपेक्षित आहे.

IND vs SL : भारत विरुद्ध श्रीलंका फायनल सामना पावसामुळे रद्द झाली तर कोण होणार 'चॅम्पियन'? जाणून घ्या समीकरण
ICC ODI World Cup : गांगुलीने द्रविडसोबत जे केलं तेच द्रविड केएलसोबत करतोय; काय घडलं होतं 2003 च्या वर्ल्डकपमध्ये?

अंतिम फेरी रद्द झाल्यास काय ?

पावसामुळे सामना पूर्ण होऊ शकला नाही, तर सामना रद्द केला जाईल आणि भारत आणि श्रीलंकेला आशिया कपचे विजेते घोषित केले जाईल. मात्र, सामना शक्यतो पूर्ण व्हावा, अशी पंचांची इच्छा असले. त्यामुळे सामना 20-20 षटकांचाच केला जाईल.

2002 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना भारत आणि श्रीलंका यांच्यात होणार होता पण पावसामुळे तो सामना रद्द करावा लागला होता. त्यामुळे भारत आणि श्रीलंकेला संयुक्त विजेता घोषित करण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com