Rohit Sharma : झेल घेतला नाही, एकालाही धावबाद केलं नाही तरी 'प्रोफेसर' रोहितला फिल्डिंगचं मेडल का देण्यात आलं?

Rohit Sharma
Rohit Sharmaesakal

Rohit Sharma : भारताने वर्ल्डकप 2023 मध्ये कोलकात्यात दक्षिण अफ्रिकेचा तब्बल 243 धावांनी पराभव केला. भारताचा हा यंदाच्या वर्ल्डकपमधील सलग आठवा विजय ठरला. या विजयात विराट कोहलीने 101 धावांची शतकी तर रविंद्र जडेजाने 33 धावात 5 विकेट्स घेत मोलाचे योगदान दिले. कर्णधार रोहित शर्माने देखील 24 चेंडूत 40 धावा करत भारताला दमदार सुरूवात करून दिली होती.

रविंद्र जडेजाने फलंदाजीतही चांगले योगदान दिले. त्याने 29 धावांची नाबाद खेळी करत भारताला 327 धावांपर्यंत पोहचण्यात मदत केली. मात्र सामन्यानंतर आपले 49 वे शतक ठोकणाऱ्या विराट कोहलीला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. जडेजाने दक्षिण अफ्रिकेविरूद्ध चांगली फिल्डिंग देखील केली होती.

त्यामुळे त्याला भारतीय संघ व्यवस्थापनाकडून देण्यात येणाऱ्या बेस्ट फिल्डरचा तरी पुरस्कार मिळेल असे वाटत होते. मात्र फिल्डिंग कोच टी दिलीप यांनी हा पुरस्कार रोहित शर्माला दिल्याने सर्वांना आश्चर्य वाटले.

Rohit Sharma
World Cup 2023 Semi-Final : पाऊस येणार पाकिस्तानच्या मदतीला? बंगळूरमधील हवामानामुळे न्यूझीलंडमधील देव पाण्यात

रविंद्र जडेजाने कगिसो रबाडाचा एक भन्नाट कॅच घेतला होता. त्यामुळे बेस्ट फिल्डरचा पुरस्कार त्यालाच मिळेल असे वाटत होते. मात्र टी. दिलीप यांनी हा पुरस्कार रोहित शर्माला दिला. रोहित शर्माने सामन्यात एकही कॅच पकडला नाही तर एकाही फलंदाजाला रन आऊट केलं नाही तरी त्याला हा पुरस्कार मिळाल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला.

रोहितला बेस्ट फिल्डरचा पुरस्कार देण्यामागं काय कारण होतं हे खुद्द फिल्डिंग कोच टी. दिलीप यांनी सांगितले. ते म्हणाले, बेस्ट फिल्डरचा पुरस्कार हा फक्त चांगला कॅच किंवा चांगले रन आऊट केल्यावर दिला जात नाही. हा पुरस्कार हा चांगल्या प्रयत्नासाठी देखील दिला जातो. रोहित शर्मा या बाबतीत आघाडीवर होता.

याचबरोबर रोहित शर्माने ज्या प्रकारे दक्षिण अफ्रिकेविरूद्धचा सामना पुढे नेला अन् फिल्डिंग प्लेसमेंट केली ती खूप खास होती. यामुळेच बेस्ट फिल्डिंगचा पुरस्कार हा रोहित शर्माला देण्यात आला.

Rohit Sharma
Sara Ali Khan: शुभमन गिलला डेट करतेय विचारताच सारा खान हसली अन् म्हणाली, "सारा का सारा दुनिया...."

बगी कॅम द्वारे विजेत्याच्या घोषणा

बेस्ट फिल्डरचा पुरस्कार देण्याची टी दिलीप यांची पद्धत एकदम खास असते. कधी लेझर शो, कधी स्पायडी कॅमचा वापर करण्यात येत होता. यावेळी रोहितला पुरस्कार देण्यासाठी बगी कॅमचा वापर करण्यात आला. बेस्ट फिल्डरचे चार दावेदार होते. यात सूर्यकुमार यादव, रविंद्र जडेजा, केएल राहुल आणि रोहित शर्मा यांचा समावेश होता. बगी कॅम शेवटी रोहितवर येऊन थांबला अन् टीम इंडियाने एकच जल्लोष केला.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com