Rohit Sharma Captaincy Comeback
esakal
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेनंतर तीन एकदिवसीय आणि पाच टी-२० सामन्याची मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेसाठी आज भारतीय संघाची घोषणा होण्याची शक्यता आहे. मात्र, नियमित कर्णधार शुबमन आजारी असल्याने रोहित शर्माकडे पुन्हा एकदा संघाच्या कर्णधारपदाची धुरा देण्यात येईल, अशी चर्चा आहे. त्यामुळे आजच्या संघ निवडीकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.