वीरुच्या वाढदिवशी रोहित शर्माचा डबल धमाका

वृत्तसंस्था
Sunday, 20 October 2019

रांचीत सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात सलामीवीर रोहितने कसोटी कारकिर्दीतील पहिले द्विशतक झळकाविले. योगायोगाने आजच्याच दिवशी सेहवागचा वाढदिवस आहे. सेहवागने सलामीवीर म्हणूनच भारतीय संघात आपले स्थान गाजविले. रोहितने 255 चेंडूत 212 धावा झळकाविल्या.

रांची : भारताचा आक्रमक सलामीवीर विरेंद्र सेहवागचा वाढदिवशी सलामीवीर रोहित शर्माने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत द्विशतक झळकावून त्याला भेट दिली. सेहवागला आज वाढदिवसानिमित्त सर्वांकडून शुभेच्छा देण्यात येत आहेत.

रांचीत सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात सलामीवीर रोहितने कसोटी कारकिर्दीतील पहिले द्विशतक झळकाविले. योगायोगाने आजच्याच दिवशी सेहवागचा वाढदिवस आहे. सेहवागने सलामीवीर म्हणूनच भारतीय संघात आपले स्थान गाजविले. रोहितने 255 चेंडूत 212 धावा झळकाविल्या. रोहितने या खेळीत 28 चौकार आणि 6 षटकार खेचले. रोहितने यापूर्वी या मालिकेत दोन शतके झळकाविली आहेत. सेहवागने शुभेच्छा देणाऱ्या सर्वांचे आभार मानले आहेत. 

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने सेहवागला शुभेच्छा देताना म्हटले आहे, की मैदानात असताना चेंडूवर प्रहार करणारा आणि नेहमीच विनोद हा मंत्र असलेल्या सेहवागला वाढदिवसाच्या शुभेच्छा. महंमद कैफ, हरभजनसिंग, व्हिव्हिएस लक्ष्मण, मयांक अगरवाल यांच्यासह अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनी सेहवागला शुभेच्छा दिल्या आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rohit Sharma completes double century day on Virendra Sehwag Birthday