T20 World Cup : प्लेईंग-11 ठरली! रोहित म्हणाला जे खेळणार त्यांना सर्व माहिती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rohit Sharma confirms India have already decided playing XI for T20 World Cup opener against Pakistan

T20 World Cup : प्लेईंग-11 ठरली! रोहित म्हणाला जे खेळणार त्यांना सर्व माहिती

T20 World Cup Team India Playing-11 : टी-20 वर्ल्ड कपला 16 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. मात्र भारताचा पहिला सामना 23 ऑक्टोबरला पाकिस्तानशी होणार आहे. दोन्ही संघ या सामन्याच्या तयारीत व्यस्त आहेत. या स्पर्धेपूर्वी भारतीय संघ दुखापतीने त्रस्त असून, संघाचे दोन प्रमुख खेळाडू बुमराह आणि जडेजा स्पर्धेबाहेर गेले आहेत. त्याचवेळी राखीव खेळाडू दीपक चहरलाही दुखापतीमुळे भारतीय संघाचा भाग नाही. मात्र भारतीय कर्णधार रोहित शर्माने शेवटच्या क्षणी निर्णय घेण्यावर विश्वास ठेवत नसल्याचे सांगितले आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी भारताकडून 11 खेळाडूंची निवड केली आहे.

हेही वाचा: T20 World Cup : सर्व कर्णधारांनी मिळून अश्विनची केली गोची; भारतीय कर्णधार काय करणार?

क्रिकेटमधील दोन कट्टर प्रतिस्पर्धा भारत आणि पाकिस्तान 23 ऑक्टोबरला भिडणार आहेत. या सामन्याच्या आधी रोहित शर्मा पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाला की, माझा शेवटच्या क्षणी घेतलेल्या निर्णयांवर विश्वास नाही. आम्ही आमच्या खेळाडूंना संघ निवडीबद्दल अगोदरच माहिती देऊ इच्छितो जेणेकरून ते लवकर तयारी करू शकतील.

माझ्याकडे पाकिस्तानच्या सामन्यासाठी आधीच 11 खेळाडू आहेत. त्या खेळाडूंना आधीच कळवले आहे. शेवटच्या क्षणी निर्णय घेण्यावर विश्वास ठेवत नाही. त्यांनी चांगली तयारी करावी अशी माझी इच्छा आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याचे महत्त्व कळते पण प्रत्येक वेळी बोलण्यात अर्थ नाही.

हेही वाचा: Smriti Mandhana : आशिया कपमधील सप्तपदी पूर्ण! एकट्या स्मृती मानधनाने कुटल्या 51 धावा

मोहम्मद शमीने जसप्रीत बुमराहच्या जागी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ICC पुरुषांच्या T20 विश्वचषकासाठी अंतिम 15 जणांच्या संघात स्थान दिले आहे. शमीचे नाव राखीव खेळाडूंच्या तीन सदस्यांच्या यादीत होते परंतु आता स्पर्धेपूर्वी त्याचा मुख्य संघात समावेश करण्यात आला आहे. ''मी मोहम्मद शमीला पाहिले नाही, परंतु मी जे काही ऐकले ते चांगले आहे. रविवारी ब्रिस्बेनमध्ये आमचा सराव सत्र आहे आणि मी शमीला पाहण्यासाठी उत्सुक आहे," असे भारताचा कर्णधार म्हणाला.