Team India : रोहितचा मेसेज आला अन् टीम इंडियाची दिवाळी पार्टी झाली रद्द | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Team India

Team India : रोहितचा मेसेज आला अन् टीम इंडियाची दिवाळी पार्टी झाली रद्द

Rohit Sharma Team India : टी-20 विश्वचषक-2022 मध्ये रविवारी भारताने सलामीच्या सामन्यात पाकिस्तानचा 4 गडी राखून पराभव केला. टीम इंडियाकडून करोडो भारतीय चाहत्यांना दिवाळीची खास भेट मिळाली. पण दुसऱ्या दिवशी सकाळी मेलबर्नहून सिडनीला जाण्यासाठी फ्लाइट पकडावी लागली. जिथे भारताला नेदरलँड्सविरुद्ध दुसरा सामना खेळायचा आहे.

टीम इंडियाने सिडनीमध्ये पाकिस्तानवरचा थरारक विजय साजरा करून एकत्र दिवाळी साजरी करण्याचा निर्णय घेतला होता. पण कर्णधार रोहित शर्माने खेळाडूंना दिलेल्या संदेशानंतर टीम इंडियाचा सिडनीतील प्लॅन रद्द झाला.

हेही वाचा: Virat Kohli | VIDEO : 'अश्विननं आपलंच डोकं चालवलं... विराटने सांगितला शेवटच्या चेंडूचा भन्नाट किस्सा

टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये पाकिस्तानच्या विजयाचा जल्लोष साजरा करण्याचा प्लॅन केला होता. पत्नी आणि मुलांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी खेळाडूंनी सर्व तयारी केली होती. टीम डिनर सिडनी हार्बर येथे करणार होते. पण मिशन अजून पूर्ण झाले नसल्याचा संदेश कर्णधार आणि प्रशिक्षकाकडून खेळाडूंना दिला. विजयाचा आनंद साजरा करण्यात आपण वाहून जाऊ नये.

राहुल द्रविड भारतीय संघाचा प्रशिक्षक झाल्यापासून संघाने निकालावर जास्त भर दिला आहे. सामन्यानंतर संघ व्यवस्थापनाकडून खेळाडूंना संदेश देण्यात आला की अस्थिर स्पर्धांमध्ये संघाने सामन्यानुसार विचार करणे आवश्यक आहे आणि जास्त पुढचा विचार करणे टाळणे आवश्यक आहे.