तिसऱ्या कसोटी सामन्यात रोहित शर्मा सलामीला येणार?

सोमवार, 24 डिसेंबर 2018

मेलबर्न : भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत विजयी सुरुवात केल्यांनतर दुसऱ्या सामन्यात पराभूत व्हावे लागले. यामुळे दोन्ही संघ 1-1 असे बरोबरीत आहेत. या दोन्ही सामन्यात भारताकडून फलंदाजीमध्ये चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे आणि विराट कोहली यांच्याकडूनच चांगली कामगिरी झाली. दोन्ही सामन्यांमध्ये भारताचे सलामीवीर फलंदाज मुरली विजय आणि लोकेश राहुल यांनी निराशा केली तर दुसऱ्या सामन्यास रोहित शर्मा पाठीच्या दुखापतीमुळे मुकला होता.

रोहित शर्माला संघात संधी मिळाली होती. पण त्याला दुखापतीमुळे त्याचा फायदा घेता आलेला नाही. मात्र त्याला मेलबर्नच्या कसोटीमध्ये सलामीला येण्याची संधी आहे. या मैदानावर जरी रोहितला कसोटीमध्ये खेळण्याचा अनुभव नसला तरी त्याने येथे दहा मर्यादित षटकांच्या सामन्यात 58च्या सरासरीने 409 धावा केल्या आहेत.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा :

INDvsAUS : विजय-राहुल फोल; अपयशी रोहित शर्माला सलामीची लॉटरी लागणार?

Web Title: Rohit Sharma to open an inning for india in third test?