Rohit Sharma : टी-20 वर्ल्ड कपनंतर 'हिटमॅन'ची आंतरराष्ट्रीय कारकीर्द संपणार का? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

rohit sharma poor form in batting continues in t20 world cup

Rohit Sharma : टी-20 वर्ल्ड कपनंतर 'हिटमॅन'ची आंतरराष्ट्रीय कारकीर्द संपणार का?

Rohit Sharma T20 World Cup Poor Form : भारतीय कर्णधार रोहित शर्मा टी-20 विश्वचषक 2022 मध्ये सतत फ्लॉप होत आहे. रोहित शर्माच्या खराब फॉर्मनंतर चाहत्यांचे म्हणणे आहे की, लवकरच भारतीय कर्णधाराची टी-20 कारकीर्द संपुष्टात येणार आहे. या वर्षी भारतीय कर्णधार रोहित शर्माचे आकडे पाहता त्याने 137 च्या स्ट्राईक रेटने 614 धावा केल्या आहेत. पण टी-20 वर्ल्ड कपमध्ये रोहित शर्माची बॅट शांत आहे. मात्र, नेदरलँडविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माने अर्धशतक झळकावले होते.

हेही वाचा: T20 WC : जुना खेळाडू बनला दक्षिण आफ्रिकेचा दुश्मन! विश्व कप मधून काढले बाहेर

नेदरलँडविरुद्धच्या सामन्याशिवाय पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेशविरुद्धच्या सामन्यांमध्ये रोहित शर्माला धावा करता आल्या नाही. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माने 7 चेंडूत 4 धावा केल्या. त्याचवेळी नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यात भारतीय कर्णधाराने 39 चेंडूत 53 धावा केल्या. यादरम्यान रोहित शर्माने 4 चौकार आणि 3 षटकार मारले.

हेही वाचा: Rahul Dravid : उपांत्य फेरीत भारतीय संघात बदल होणार, राहुल द्रविडने केली पुष्टी

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात पुन्हा एकदा रोहित शर्मा स्वस्तात बाद झाला. या सामन्यात रोहित शर्माने 14 चेंडूत 15 धावा केल्या. बांग्लादेशविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माने 8 चेंडूत 2 धावा करत आउट झाला. मात्र, अशा खराब फॉर्मनंतर रोहित शर्माच्या कर्णधारपदावरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दरम्यान, लवकरच अष्टपैलू हार्दिक पांड्याकडे टी-20 संघाची कमान मिळू शकते, असे मानले जात आहे.