Rahul Dravid : उपांत्य फेरीत भारतीय संघात बदल होणार, राहुल द्रविडने केली पुष्टी

rahul dravid to consider changes in team india
rahul dravid to consider changes in team india sakal

Rahul Dravid T20 World Cup : भारताने सुपर-12 मध्ये झिम्बाब्वेचा 71 धावांनी पराभव करत गट-2 मध्ये अव्वल स्थान पटकावले. आता टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारताचा सामना इंग्लंडशी होणार आहे. भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी कबूल केले आहे की, इंग्लंडविरुद्धच्या आगामी उपांत्य फेरीसाठी तो आपली प्लेइंग इलेव्हन बदलण्याचा विचार करणार आहे.

rahul dravid to consider changes in team india
T20 World Cup : टीम इंडियाचा उपांत्य फेरीत इंग्लंडवर विजय निश्चित! कारण...

जोस बटलरच्या नेतृत्वाखालील इंग्लंडशी सामना करण्यासाठी भारत गुरुवारी अॅडलेडला जाणार आहे. याआधी द्रविडने सांगितले की, तो या सामन्यासाठी एका विशिष्ट इलेव्हनची निवड करणार जी परिस्थितीनुसार असणार आहे. याचा अर्थ अनुभवी लेग-स्पिनर युजवेंद्र चहलला पहिल्यांदाच अॅडलेड ओव्हलवर या स्पर्धेत खेळण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. ही खेळपट्टी संथ गोलंदाजीला अनुकूल आहे.

rahul dravid to consider changes in team india
T20 WC : जुना खेळाडू बनला दक्षिण आफ्रिकेचा दुश्मन! विश्व कप मधून काढले बाहेर

झिम्बाब्वेविरुद्ध खेळलेल्या ऋषभ पंतच्या जागी अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकचेही पुनरागमन होऊ शकते. अॅडलेडला रवाना होण्याआधी आणि झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यानंतर राहुल द्रविड म्हणाला, मला वाटतं की 15 मधील प्रत्येकाबद्दल आमचं मन पूर्णपणे मोकळं आहे. आमचा विश्वास आहे की जो कोणी 11 मध्ये असेल तो आम्हाला कमकुवत बनवणार नाही, आम्ही ज्या प्रकारची टीम निवडली आहे.

rahul dravid to consider changes in team india
Sikandar Raza : पाकिस्तानचा पराभव करणाऱ्या 'सिकंदर 'ला पाक एअर फोर्सने नाकारले होते

तो पुढे म्हणाला, आज मी अ‍ॅडलेडमध्ये काही सामने पाहिले आणि मला माहित आहे की ट्रॅक संथ आहे. खरे सांगायचे तर, बांगलादेशविरुद्ध आम्ही अॅडलेडमध्ये ज्या खेळपट्टीवर खेळलो ती वेगळी विकेट होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com