शार्दुल नेहमीच असं करतो म्हणून आम्ही त्याला... रोहित 'लॉर्ड'बद्दल हे काय बोलला? | Shardul Thakur Rohit Sharma | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rohit Sharma Praise Shardul Thakur

Shardul Thakur : शार्दुल नेहमीच असं करतो म्हणून आम्ही त्याला... रोहित 'लॉर्ड'बद्दल हे काय बोलला?

Rohit Sharma Praise Shardul Thakur : भारताने तिसऱ्या वनडे सामन्यात न्यूझीलंडचा 90 धावांनी पराभव करत मालिका 3 - 0 अशी जिंकली. या मालिकाविजयाबरोबरच भारत आयसीसी वनडे रँकिंगमध्ये अव्वल स्थानी देखील पोहचला आहे. सामन्यात जरी तब्बल 680 धावा झाल्या असल्या तरी या सामन्याचा मानकरी हा मध्यमगती गोलंदाज शार्दुल ठाकूर ठरला! कारण शार्दुल ठाकूरने पकड निर्माण करत असतानाच पाठोपाठ दोन धक्के देत भारताला सामन्यात पुन्हा आणले होते.

हेही वाचा: IND vs NZ : भारताने किवींकडून हिसकावले अव्वल स्थान; शार्दुलने मोडून काढली कॉन्वेची झुंज

दरम्यान, सामना झाल्यावर रोहित शर्मा भारताच्या विजयात कोणी कसे योगदान दिले हे सांगत होता. त्यावेळी रोहित लॉर्ड शार्दुल ठाकूरबद्दल म्हणाला की, 'मी मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमीच्या अनुपस्थितीत आम्ही बेंचवरच्या खेळाडूंना संधी देणार होतो. आम्हाला उमरान मलिक आणि युझवेंद्र चहलला संधी देऊन ते दबावाच्यावेळी कशी कामगिरी करतात हे पहायचे होते.'

रोहित पुढे म्हणाला की, 'मला माहिती होतं की धावफलकावर चांगल्या धावा झाल्या आहेत. मात्र या मैदानावर कोणतीही धावसंख्या सुरक्षित नाही. आम्ही चांगली गोलंदजाी केली. आम्ही आमच्या रणनितीप्रमाणे गोलंदाजी करत मोक्याच्या क्षणी सामन्यावर पकड मिळवली.'

दरम्यान, समालोचक हर्षा भोगले यांनी रोहितला तू शार्दुल ठाकूरला विसतोयस याची आठवण करून दिली. त्यानंतर शार्दुल ठाकूरबद्दल बोलताना रोहित म्हणाला की, 'शार्दुल आमच्यासाठी अशी कामगिरी नेमीच करत आला आहे. म्हणून आम्ही संघातील खेळाडू त्याला जादूगार म्हणतो. तो येतो आणि विकेट्स काढून देतो. त्याने जास्तीजास्त सामने खेळावे असे मला वाटते.'

हेही वाचा: Ravindra Jadeja Ranji Trophy : रविंद्र जडेजाचे 'रिकामे' पुनरागमन; पहिल्या दिवशी एकही..

रोहितला वनडेतील अव्वल रँकिंगबद्दल विचारले त्यावेळी तो म्हणाला की, आम्ही रँकिंबद्दल फारशी चर्चा करत नाही. आम्ही मैदानावर कशाप्रकारे चांगली कामगिरी करता येईल याची चर्चा करत असतो. आगामी कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाविरूद्ध मुकाबला आहे. कांगारूंचा संघ दर्जेदार आहे. त्यामुळे ही मालिका आमच्यासाठी सोपी असणार नाही.

भारत ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर - गावसकर ट्रॉफी येत्या 9 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. या मालिकेत 4 कसोटी सामने होणार असून. त्यानंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 3 वनडे सामन्यांची मालिका देखील होणार आहे.

(Sports Latest News)

हेही वाचा : ..या शहरात सापडतात शेकडो रोनाल्डो आणि मेस्सी