IND vs NZ : भारताने किवींकडून हिसकावले अव्वल स्थान; शार्दुलने मोडून काढली कॉन्वेची झुंज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shardul Thakur Kuldeep Yadav Shine

IND vs NZ : भारताने किवींकडून हिसकावले अव्वल स्थान; शार्दुलने मोडून काढली कॉन्वेची झुंज

IND vs NZ ICC ODI Ranking : भारताने न्यूझीलंडचा धावांनी पराभव करत मालिका 3 - 0 अशी जिंकली. भारताच्या 386 धावांचा पाठलाग करताना डेवॉन कॉन्वेच्या झुंजार 136 धावांच्या जोरावर किवींनी कडवी झुंज दिली. मात्र न्यूझीलंडला 41.2 षटकात 295 धावांमध्ये गुंडाळले. शार्दुल ठाकूरने किवींना पाठोपाठ धक्के देत भारताला विजयपथावर आणले.

शार्दुल आणि कुलदीपने प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. तर फलंदाजीत रोहित शर्माने 101 तर शुबमन गिलने 112 धावांची शतकी खेळी केली. हार्दिकनेही 54 धावांचे योगदान देत भारताला 385 धावांपर्यंत पोहचवले. भारताने न्यूझीलंडविरूद्धची मालिका 3 - 0 अशी जिंकत आयसीसी वनडे रँकिंगमध्ये अव्वल स्थान पटकावले.

भारताने न्यूझीलंडला दुसऱ्या सामन्यात 8 विकेट्स राखून पराभूत केले त्यावेळी अव्वल स्थानावर असलेली न्यूझीलंडने आपले अव्वल स्थान गमावले होते. त्यानंतर तिसऱ्या सामन्यात भारताने किवींचा 90 धावांनी पराभव केला. आता भारत वनडे रँकिंगमध्ये अव्वल स्थानावर असून इंग्लंड तीन दिवसांचा, औट घटकेचा नंबर 1 राहिला.

हेही वाचा: Ravindra Jadeja Ranji Trophy : रविंद्र जडेजाचे 'रिकामे' पुनरागमन; पहिल्या दिवशी एकही..

भारताचे 386 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या किवींना दुसऱ्याच षटकात हार्दिक पांड्याने पहिला धक्का दिला. मात्र डेवॉन कॉन्वे आणि हेन्री निकोल्स यांनी किवींचा डाव सावरत दुसऱ्या विकेटसाठी 106 धावांची शतकी भागीदारी रचली.

ही जोडीन अखेर कुलदीप यादवने निकोल्सला 42 धावांवर बाद करत फोडली. मात्र हेन्री निकोल्स बाद झाल्यानंतर सलामीवीर डेवॉन कॉन्वेने किवींच्या डावाची सूत्रे आपल्या हातात घेतली. त्याने 71 चेंडूत शतकी खेळी करत न्यूझीलंडला 24 षटकात 175 धावांपर्यंत पोहचवले.

मात्र शार्दुल ठाकूरने 26 व्या षटकात डॅरेल मिचेल (24) आणि टॉम लॅथम यांना पाठोपाठच्या चेंडूवर बाद करत किवींचा झंजावात रोखण्याचा प्रयत्न केला. शार्दुलनेच 28 व्या षटकात ग्लेन फिलिप्सला 5 धावांवर बाद करत किवींची अवस्था 5 बाद 200 धावा अशी केली.

शार्दुलने जरी किवींना पाठोपाठ धक्के दिले असले तरी शतकवीर डेवॉन कॉन्वे मात्र एकाकी झुंज देत होता. मात्र अखेर उमरान मलिकने त्याचा अडसर दूर केला. कॉन्वेने 100 चेंडूत 138 धावांची तुफानी खेळी केली.

यानंतर मायकल ब्रेसवेलने 26 धावा करत थोडाफार प्रतिकार केला. मात्र भारताने किवींना 295 धावात गुंडाळत व्हाईट वॉश दिला.

हेही वाचा: Rohit Sharma : धोनी - सचिन करू शकले नाहीत ते रोहितनं करून दाखवलं

तत्पूर्वी, भारताने न्यूझीलंडविरूद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात प्रथम फलंदाजी करत किवींसमोर 385 धावांचे आव्हान ठेवले. भारताकडून सलामीवीर शुभमन गिलने 112 धावांची तर रोहितने 101 धावांची शतकी खेळी केली. या दोघांनी भारताला 212 धावांची सलमी दिली. मात्र त्यानंतर भारताचा डाव गडगडला. अखेर हार्दिक पांड्याने स्लॉग ओव्हरमध्ये 54 धावांची आक्रमक खेळी करत भारताला 350 च्या पार पोहचवले.

(Sports Latest News)

हेही वाचा : ..या शहरात सापडतात शेकडो रोनाल्डो आणि मेस्सी