Video : वडापाव पॉवर फक्त 0.45 सेकंद...! कर्णधार रोहित शर्माचा अविश्वसनीय' कॅच' ठरला सामन्याचा टर्निंग पॉइंट

Rohit Sharma IND vs ENG 2nd Test :
Rohit Sharma Takes Blinder Of A Catch Ollie Pope During IND vs ENG 2nd Test marathi news
Rohit Sharma Takes Blinder Of A Catch Ollie Pope During IND vs ENG 2nd Test marathi newssakal

India vs England 2nd Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरी कसोटी विशाखापट्टणम येथे खेळली जात आहे. भारत दुसऱ्या कसोटीत ड्रायव्हिंग सीटवर असल्याचे दिसत आहे. भारताने चौथ्या डावात इंग्लंडला 399 धावांचे लक्ष्य दिले होते. पहिल्या कसोटीत इंग्लंड संघाचा हिरो ठरलेल्या ओली पोपला दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात केवळ 23 धावा करता आल्या. अश्विनने पोपला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. पोपचा कॅच कर्णधार रोहित शर्माने घेतला जो सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरला.

दुसऱ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी भारत तिसऱ्या विकेटच्या शोधात होता. कारण जॅक क्रॉली आणि ओली पोप वेगाने धावा करत होते. अश्विन दोन्ही फलंदाजांना अडचणीत आणत होता आणि यादरम्यान रोहित शर्माने आश्चर्यकारक झेल घेतला.(Rohit Sharma Takes Blinder Of A Catch Ollie Pope During IND vs ENG 2nd Test)

Rohit Sharma Takes Blinder Of A Catch Ollie Pope During IND vs ENG 2nd Test marathi news
Shubman Gill Ind vs Eng : 13 डावांनंतर शुभमन गिल कसा काय आला फॉर्ममध्ये? BCCI ने शेअर केला 'तो' व्हिडिओ

दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात ओली पोप पुन्हा एकदा भारताकडून विजय हिसकावण्याचा प्रयत्न करत होता. पहिल्या कसोटीप्रमाणेच दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावातही तो पुन्हा एकदा आक्रमक फलंदाजी करताना दिसला. ओली पोप पुन्हा एकदा मोठी खेळी खेळेल असे दिसते.

त्यानंतर कर्णधार रोहित शर्माने त्याचा सर्वात अनुभवी फिरकी गोलंदाज आर. अश्विनकडे चेंडू सोपवला गेला. इंग्लंडच्या डावातील 28व्या षटकात अश्विनचा पहिलाच चेंडू ऑली पोपच्या बॅटला लागला आणि फक्त 0.45 सेकंदात रोहितकडे गेला. त्यानंतर रोहित शर्माने शानदार झेल घेत त्याला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. रोहितने जेव्हा हा झेल घेतला तेव्हा ओली पोपचाही यावर विश्वास बसत नव्हता.

दुसऱ्या कसोटीत भारतीय युवा फलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली. पहिल्या डावात यशस्वी जैस्वालच्या उत्कृष्ट द्विशतकानंतर शुभमन गिलने दुसऱ्या डावातही शतक झळकावले. गिलचे हे शतक 13 डावांनंतर आले. तसेच गिलचे तिसऱ्या क्रमांकावर असलेले हे पहिले शतक होते. ज्याच्या मदतीने भारताने दुसऱ्या डावात इंग्लंडला 399 धावांचे मोठे लक्ष्य दिले.

तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताने 396 धावा केल्या होत्या. याला प्रत्युत्तर देताना इंग्लंडला केवळ 253 धावा करता आल्या. गिलच्या शतकाच्या जोरावर भारताने दुसऱ्या डावात 255 धावा केल्या होत्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com