
भारत आणि वेस्ट इंडीज (India vs West Indies) यांच्यातील वनडे मालिका उद्या ( दि. 6) पासून सुरू होत आहे. दरम्यान, शिखर धवन, श्रेयस अय्यर, नवदीप सैनी आणि ऋतुराज गायकवाड या भारतीय संघातील खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याने संघ निवडीबाबत समस्या निर्माण झाली आहे. भारताचा सलामीवीर शिखर धवन (Shikhar Dhawan) आणि त्याचा बॅकअप ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) हे दोघेही कोरोना बाधित झाल्याने बीसीसीआयने ऐनवेळी मयांक अग्रवाल आणि इशान किशन (Ishan Kishan) या दोन सलामीवीरांना संघात सामिल केले होते. आता कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) त्याच्यासोबत पहिल्या वनडे सामन्यात कोण सलामीला येणार याचा खुलासा आदल्या दिवशीच केला. (Rohit Sharma reveal Ishan Kishan is the only option for opening with him in 1st ODI Against West Indies)
दरम्यान, पहिल्या वनडेच्या पूर्वसंध्येला कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) त्याच्यासोबत कोण सलामी देणार याचा खुलासा केली. त्याने सामन्यापूर्वीच्या पत्रकार परिषदेत (Rohit Sharma Pre Match Press Conference) सांगितले की, 'सलामीला इशान किशन हा एकमेव पर्याय आमच्याकडे आहे आणि तो माझ्यासोबत सलामी देईल.' रोहित शर्मा पुढे म्हणाला की, 'मयांक अग्रवाल याला संघात सामिल करून घेतले आहे. मात्र तो अजून विलगीकरणात आहे. तो उशिरा संघाशी जोडला गेला. कोरोनामुळे काही नियमांचे पालन करावे लागते. जर कोणी प्रवास करून आले तर आम्ही त्याला तीनदिवस सक्तीच्या विलगीकरणात ठेवतो. त्याचे विलगीकरण अजून संपलेले नाही. त्यामुळे इशान किशनच माझ्याबरोबर सलामी देणार.'
भारत आणि वेस्ट इंडीज (India vs West Indies) यांच्यातील वनडे मालिका ही अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. ही मालिका प्रेक्षकांविना होणार आहे. मालिकेतील दुसरा सामना 9 तर तिसरा सामना 11 फेब्रुवारीला होणार आहे.
भारतीय वनडे संघ :
रोहित शर्मा, शिखर धवन, इशान किशन, विराट कोहली, ऋतुराज गायकवाड, मयांक अग्रवाल, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दीपक हुड्डा, वॉशिंग्टन सुंदर, केएल राहुल (दुसऱ्या वनडेपासून उपलब्ध), ऋषभ पंत, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.