रोहित शर्मा घाबरलेल्या खेळाडूंना म्हणतो मैं हू ना!

Rohit Sharma Said Players do not a worry about your positions
Rohit Sharma Said Players do not a worry about your positions esakal

भारतीय संघाचे नेतृत्व रोहित शर्माच्या (Rohit Sharma) हातात आल्यानंतर संघात अनेक बदल होत आहेत. ज्या खेळाडूंना अनेक दिवसांपासून खेळण्याची संधी मिळाली नव्हती त्यांना आपली कामगिरी पुन्हा सिद्ध करण्याची संधी मिळत आहे. दरम्यान, रोहितच्या नेतृत्वात भारताने वेस्ट इंडीज (West Indies) पाठोपाठ श्रीलंकेलाही (Sri Lanka) टी 20 मालिकेत व्हाईट वॉश दिला. या विजयानंतर रोहित शर्माने आपल्या संघातील खेळाडूंसाठी एक दिलासादायक वक्तव्य केले.

Rohit Sharma Said Players do not a worry about your positions
श्रेयस म्हणतो टी 20 मध्ये असं करणे म्हणजे गुन्हाच!

रोहित शर्मा म्हणाला, 'काही वेळा आपल्याला पाठीमागे ठवलं असल्याचे भावना निर्माण होऊ शकते. मात्र खेळाडूंना हे सांगणे गरजेचे आहे की तुम्ही संघातील स्थानाबाबत काळजी करू नका. आम्ही संघातील त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्हाला भविष्याचा विचार करायचा आहे.'

रोहितच्या नेतृत्वात बऱ्याच काळापासून मर्यादित षटकातील सामन्यात संधी न मिळालेल्या खेळाडूंना त्यांची क्षमता सिद्ध करण्याची पुन्हा एकदा संधी मिळाली आहे. हे रोहितच्या नेतृत्वाचे वैशिष्ट आहे. रोहित कर्णधार झाल्यानंतर चायनामन गोलंदाज कुलदीप यादव (Kuldeep Yadav) आणि युझवेंद्र चहलला (Yuzvendra Chahal) पुन्हा एकदा टी 20 संघात स्थान मिळाले. याचा अर्थ या दोघांपैकी एक जण ऑस्ट्रेलियात (Australia) होणाऱ्या टी 20 वर्ल्डकप (T20 World Cup) संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे.

Rohit Sharma Said Players do not a worry about your positions
मुंबईचा मोहिते सलग 50 तास करतोय बॅटिंग; रडारवर आहेत 72 तास

'आम्ही काही खेळाडूंना चांगली संधी देण्याचा विचार केला आहे. काही खेळाडूंनी या संधीचे सोने केले आहे. असेच जर इतर खेळाडू देखील करतील. यामुळे तुमच्या संघाची ताकद वाढणार आहे. हे मोठे आव्हान आहे. कायम फॉर्ममध्ये नसलेल्या खेळाडूंपेक्षा फॉर्ममधील खेळाडू संघात असणे हे महत्वाचे असते.' यावर रोहित शर्माने भर दिला.

बीसीसीआयने (BCCI) श्रीलंकेविरूद्धच्या टी 20 मालिकेसाठी विराट कोहली (Virat Kohli) आणि ऋषभ पंत (Rishabh Pant) यासरख्या मोठ्या खेळाडूंना बायो बबलमधून ब्रेक दिला. त्यानंतर केएल राहुल, सूर्यकुमार यादव, दीपक चहर हे दुखापतग्रस्त झाल्याने रोहित शर्माला त्याची बेंच स्ट्रेंथ चाचपण्याची चांगली संधी मिळाली. या संधीचे श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) सारख्या खेळाडूंनी सोनं करून दाखवलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com