World Cup 2019 : हीटमॅन हीट पाकची हवा टाईट 

Rohit Sharma scores a century.jpg
Rohit Sharma scores a century.jpg

वर्ल्ड कप 2019 : मॅंचेस्टर : पाकिस्तानच्या प्रथम गोलंदाजी करण्याच्या निर्णयाला सपशेल चुकीचा ठरवत भारताचा सलामीवीर रोहित शर्माने एकदिवसीय कारकिर्दीतील 24वे शतक झळकाविले. या शतकासह विश्वकरंडकात पाकिस्तानविरुद्ध शतक झळकविणारा तो भारताचा केवळ दुसरा खेळाडू ठरला आहे. 

पाकिस्तानचे भले भले गोलंदाज महंमद आमीर, वहाब रियाझ आणि हसन अली यांचची जोरदार धुलाई करत 85 चेंडूत शतक साजरे केले. यंदाच्या विश्वकरंडतील हे त्याचे दुसरे शतक आहे. 

त्याच्या शतकी खेळीत त्याने नऊ चौकार आणि तीन षटकार खेचले. नवव्या षटकात तो धावबाद होता होता वाचला होता. तसेच या सामन्यात त्याने भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा सर्वाधिक षटकारांचा विक्रमही मोडला. 

रोहितने हसन अलीच्या गोलंदाजीवर मारलेला षटकार हा रोहितला षटकारांचा बादशहा बनवून गेला. भारताच्या खेळाच्या सहाव्या षटकात त्याने चेंडून सीमारेषेच्या बाहेर टोलावला आणि याच षटकाराने त्याने धोनीचा विक्रम मोडीत काढला. या षटकारासह तो भारताकडून एकदिवसीय सामन्यात सार्वाधिक षटकार ठोकणार खेळाडू ठरला आहे. याआधी हा विक्रम धोनीच्या नावावर होता. धोनीने एकदिवसीय सामन्यात एकूण 355 षटकार ठोकले आहेत. तर रोहित शर्माचे आता 356 षटकार झाले आहेत.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com