Rohit Sharma : कर्णधार रोहितने दिला इशारा, 'इंग्लंड आम्हालाही...' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rohit Sharma

Rohit Sharma : कर्णधार रोहितने दिला इशारा, 'इंग्लंड आम्हालाही...'

Rohit Sharma T20 World Cup : टी-20 विश्वचषक 2022 मध्ये भारतीय संघाने त्यांच्या गटात अव्वल स्थान पटकावत उपांत्य फेरीत स्थान निश्चित केले. दरम्यान, झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्माचे एक वक्तव्य समोर आले आहे. ज्यामध्ये रोहित शर्माने इंग्लंडकडून मिळणार्‍या आव्हानाचा उल्लेख केला आहे. उपांत्य फेरीत भारत आणि इंग्लंडचे संघ 10 नोव्हेंबरला अॅडलेड ओव्हलवर होणार आहे.

हेही वाचा: Kapil Dev : 'लाज वाटत होती म्हणून तोंड लपवलं!', कपिल देव यांची अश्विनवर बोचरी टीका

रोहित म्हणाला की, परिस्थिती समजून घेण्याचे आव्हान आमच्यासमोर असणार आहे. दुसरीकडे इंग्लंड देखील चांगला संघ आहे आणि गेल्या काही काळापासून ते चांगले क्रिकेट खेळत आहे. हा एक चांगला सामना होईल. फक्त प्रत्येक खेळाडूने आपले पूर्ण योगदान दिले पाहिजे. हा उच्च दाबाचा सामना असणार आहे. आम्हाला फक्त चांगले खेळायचे आहे. इंग्लंडविरुद्ध आम्ही झटपट जुळवून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. याशिवाय रोहित शर्माने जगभरातील चाहत्यांचे आभारही मानले आहेत. झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात भारताने 72 धावांनी विजय मिळवला होता. 

हेही वाचा: Shoaib Akhtar : रावळपिंडी एक्सप्रेसची टीम इंडियाला धमकी, व्हिडीओ शेअर करत म्हणातो...

संघांनी उपांत्य फेरीत स्थान निश्चित करेपर्यंत ही स्पर्धा अतिशय रोमांचक होती. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील फायनलच्या आशा पुन्हा एकदा उंचावल्या आहेत. या विश्वचषकात पाकिस्तानसाठी अनेक चमत्कार घडले आहेत. ग्रुप स्टेजमध्ये भारत आणि झिम्बाब्वेविरुद्धचे पहिले दोन सामने गमावल्यानंतर पाकिस्तानचा संघ सेमीफायनलमध्ये पोहोचेल असे क्वचितच कुणाला वाटले होते, पण नेदरलँड्सने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केल्यानंतर पाकिस्तानचा संघही उपांत्य फेरी गाठण्यात यशस्वी ठरला.