VIDEO: 'चल भाग उधर' धोनीनंतर आता रोहितची 'माईकवाणी'

Rohit Sharma Stump Mic Video gone Viral after 2nd ODI against west indies
Rohit Sharma Stump Mic Video gone Viral after 2nd ODI against west indies esakal

अहमदाबाद: रोहित शर्माने (Rohit Sharma) वनडे संघाचा पूर्णवेळ कर्णधार झाल्यानंतरची आपली पहिलीच मालिका जिंकून कॅप्टन्सीचा विजयी नारळ फोडला. रोहित शर्मा आता महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) आणि विराट कोहलीचा नेतृत्वाचा वारसा पुढे चालवत आहे. रोहितची नेतृत्वाची शैली थोडीफार धोनीच्या जवळ जाते असे जाणकार सांगतात. मात्र याची प्रचिती दुसऱ्याच सामन्यात आली. माहीची नेतृत्व करताना व्हायरल होणारी माईकवाणी आपण सर्वांनीच ऐकली आहे. विराटही स्टम्प माईकचा वापर करताना आपण पाहिले आहे. मात्र आता रोहित शर्माने देखील तीच स्टाईल उचलली आहे. रोहित शर्माच्या माईकवाणीचा एक व्हिडिओ (Rohit Sharma Stump Mic Video) सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Rohit Sharma Stump Mic Video gone Viral after 2nd ODI against west indies)

या व्हिडिओत वेस्ट इंडीज 44 षटकात 190 धावांपर्यंत पोहचला असल्याचे दिसते. वेस्ट इंडीजच्या डावाचे 45 वे षटक टाकण्यासाठी रोहित शर्माने चेंडू वॉशिंग्टन सुंदरकडे (Washington Sundar) सोपवला होता. त्याच्या गोलंदाजीवर रोहित शर्मा क्षेत्ररक्षण लावताना या व्हिडिओत दिसते. याचदरम्यान, तो संघातील एका खेळाडूवर एका जागेवरून दुसऱ्या जागी जात असताना आळस दाखवल्यावरून ओरडतो. रोहित शर्मा, 'तुला काय झाले आहे? तू सरळ पळत का नाही आहेस? जा तिकडं पळ' असे म्हणताना दिसतो.

रोहितच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारताने दुसऱ्या वनडे (ODI Cricket) सामन्यात प्रथम फलंदाजी करताना सामन्यात 9 बाद 237 धावा केल्या होत्या. त्यानंतर भारताने वेस्ट इंडीजला 46 षटकात 193 धावात गुंडाळत सामना 44 धावांनी जिंकला. आता भारताकडे 3 वनडे सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी आहे. त्यामुळे उद्या 11 फेब्रुवारीला होणाऱ्या तिसऱ्या सामन्यात भारताला संघात काही बदल करून विविध कॉम्बिनेशन पडताळून पाहता येतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com