Rohit Sharma Viral Video
esakal
टी२० आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्मा सध्या कुटुंबीय आणि मित्रांसोबत वेळ घालवत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून तो सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय झाला आहे. तो सातत्याने व्हिडिओ आणि फोटो शेअर करतो आहे. महत्त्वाचे म्हणजे त्याच्या पोस्ट्स सोशल मीडियावरही व्हायरल होत असून चाहत्यांना त्याचा हा अंदाज प्रचंड आवडतो आहे. अशातच त्याने आता आणखी एक मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे.