esakal | "विराट, रोहित नव्हे तर 'हा' फलंदाज जिंकवून देऊ शकेल कसोटी मालिका"
sakal

बोलून बातमी शोधा

Team-India

रोहित, विराट नाही; 'हा' फलंदाज जिंकवून देऊ शकतो कसोटी मालिका!

sakal_logo
By
विराज भागवत

Ind vs Eng कसोटी मालिकेबद्दल केलं मोठं विधान

Ind vs Eng 4th Test: इंग्लंडविरूद्धची (England) पहिली कसोटी पावसामुळे अनिर्णित राहिली. दुसरी कसोटी भारताने (Team India) १५१ धावांनी जिंकली तर तिसरी कसोटी इंग्लंडने १ डाव आणि ७६ धावांनी जिंकली. सध्या कसोटी मालिका (Test Series) १-१ अशी बरोबरीत आहे. मालिकेत दोन सामने शिल्लक असून हे दोन्ही सामने जिंकणारा संघ मालिका खिशात घालू शकतो. याचदरम्यान, टीम इंडियाचे माजी निवड समिती अध्यक्ष एमएसके प्रसाद (MSK Prasad on Rishabh Pant) यांनी भारताला मालिका जिंकण्यासाठी एक सल्ला दिला आहे.

हेही वाचा: अजिंक्य रहाणेच्या जागेसाठी 'टीम इंडिया'कडे आहेत 'हे' दोन पर्याय

"ऋषभ पंतने ऑस्ट्रेलिया आणि भारतात दमदार कामगिरी करत भरपूर धावा केल्या. ऑस्ट्रेलियात पिच टणक आणि उसळतं असतं. तर भारतातील पिच हे फिरकीला पोषक असतं. पंतने या दोन्ही ठिकाणी चांगल्या धावा केल्या आहेत. इंग्लंडमध्ये फलंदाजी करण्यासाठीची परिस्थिती थोडीशी जास्त कठीण असते. त्यामुळे अशा पिचवर पंतने सेट होण्यासाठी थोडा वेळ घ्यायला हवा आणि त्यानंतर धावांचा विचार करायला हवा", असा सल्ला टीम इंडियाचे माजी निवड समिती अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी दिला.

हेही वाचा: भारताचा दारूण पराभव करूनही इंग्लंडने बदलला उपकर्णधार, कारण...

Rishabh-Pant

Rishabh-Pant

"ऋषभ पंतला आपल्या बचावात्मक फलंदाजीवर भरवसा आहे. पण त्याची फलंदाजी मात्र ऑस्ट्रेलिया किंवा भारतातील खेळपट्ट्यांप्रमाणेच सुरू आहे. ऑस्ट्रेलियात किंवा भारतात झटपट धावा करून तो स्वत:ला पिचवर सेट करत असे. पण इंग्लंडमधील वातावरण तसं नाहीये. त्यामुळे त्याला त्या विचार पद्धतीतून बाहेर यावं लागेल आणि चांगली खेळी करावी लागेल", असे प्रसाद म्हणाले.

हेही वाचा: विराटला खाली ढकलून रोहित शर्मा Top 5मध्ये; जो रूट अव्वलस्थानी

"इंग्लंडमध्येही ऋषभ पंतने दमदार शतक झळकावलं आहे. पण त्या खेळीच्या वेळी त्याने आधी शांतपणे पिचवर सेट होण्याला प्राधान्य दिलं होते. सध्याच्या ऋषभच्या खेळीकडे पाहून मला असं वाटतं की बॅटिंग कोच आणि संघ व्यवस्थापन नक्कीच ऋषभ पंतशी याबद्दल चर्चा करत असेल. महत्त्वाचे म्हणजे आता त्याला स्वत:ला लवकर सावरावे लागेल. कारण मधल्या फळीत आता त्याच्या खेळीला खूप महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे आता भारताला जर येथून पुढे मालिका जिंकायची असेल तर मधल्या फळीत ऋषभ पंतची बॅटिंग खूपच निर्णायक ठरेल", असं मोठं विधान त्यांनी केलं.

loading image
go to top