Team India T20 Squad : रोहित शर्मा - विराट कोहली अफगाणिस्तानविरूद्धची टी 20 मालिका खेळणार?

Team India T20 Squad
Team India T20 SquadESAKAL

Rohit Sharma Virat Kohli Comeback In T20I : भारताचे दोन दिग्गज फलंदाज अखेर टी 20 संघात परतणार यावर शिक्कामोर्तब झालं आहे. स्पोर्ट्स टुडेने दिलेल्या माहितीनुसार रोहित शर्मा आणि विराट कोहली अफगाणिस्तानविरूद्धच्या टी 20 मालिकेत खेळणार आहेत.

भारताचा टी 20 कर्णधार हार्दिक पांड्या आणि उपकर्णधार सूर्यकुमार यादव दोघेही दुखापतीमुळे या मालिकेला मुकणार आहे. संघ जूनमध्ये युएसए आणि वेस्ट इंडीजमध्ये होणाऱ्या टी 20 वर्ल्डकपपूर्वी भारतीय संघ एकच टी 20 मालिका खेळणार आहे. त्यामुळे संघाची बांधणी करण्याच्या दृष्टीकोणातून ही मालिका महत्वाची आहे.

या मालिकेनंतर भारतीय संघ इंग्लंडसोबत 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्यानंतर आयपीएल 2024 होईल. आयपीएलनंतर भारतीय संघ टी 20 वर्ल्डकप खेळण्यासाठी युएसएला रवाना होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com