ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेतून ठरणार रोहित-विराटचं भवितव्य? माजी प्रशिक्षकाच्या विधानानं खळबळ...

Rohit Sharma-Virat Kohli’s Future : येत्या रविवारपासून पर्थ येथून सुरू होणाऱ्या भारत-ऑस्ट्रेलियामधील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत रोहित आणि विराट यांच्या कामगिरीवर सर्वांचे लक्ष असणार आहे. मात्र, त्यापूर्वी भारताच्या माजी प्रशिक्षकांनी महत्त्वाचे विधान केलं आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.
Rohit Sharma-Virat Kohli’s Future

Rohit Sharma-Virat Kohli’s Future

esakal

Updated on

तंदुरुस्ती, फॉर्म आणि प्रबळ इच्छाशक्ती यावर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचे २०२७ मधील विश्वकरंडक स्पर्धेत खेळण्याचे भवितव्य अवलंबून असणार आहे. या तिन्ही घटकांची चाचणी येत्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत होणार आहे, असे मत भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी व्यक्त केले.

२०१७ ते २०२१ या कालाखंडात भारताचे प्रशिक्षक राहिलेल्या रवी शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली कोहलीप्रमाणे रोहितही अधिक सक्षम झाले होते. ते म्हणतात या दोघांनाही भारताच्या एकदिवसीय संघातले आपले स्थान कायम ठेवायचे असेल, तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध ठोस कामगिरी करावीच लागेल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com